tambe farmer.jpg 
नाशिक

दुर्दैवी! त्या क्षणी ना बायको आठवली ना लेकरं; शेतकऱ्याच्या एकाच निर्णयाने सारं काही संपलं

सोमनाथ चौधरी

नाशिक / दिक्षी : त्या क्षणाला ना बायको आठवली..ना लेकरं..ना कुटुंब..केवळ एकच विचार डोक्यात आणि सारं काही संपलं होतं. त्याच्या एका निर्णयाने पुढे काय होईल कदाचित हाही विचार तेव्हा त्याला करावासा वाटला नाही. केवळ आणि केवळ आर्थिक विवंचना..झालेल्या प्रकाराने कुटुंबियांनाही जबरदस्त धक्का बसला आहे.

केवळ आणि केवळ आर्थिक विवंचना

बाबूराव तांबे याच्या एकत्रित कुटूंबाला ६ एकर इतकी शेतजमीन आहे तर त्यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेचे १२ लाख  व जिव्हाळे विविध कार्यकारी सोसायटीचे ६ लाख तसेच इतर हातउसणे २ लाख असे एकूण २० लाख इतके कर्ज आहे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे डोक्यावर असलेला कर्जाचा भार कसा कमी करावा या चिंतेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. बाबुराव तांबे यांच्या पाशात दोन भाऊ पत्नी एक मुलगा भाऊजया पुतणे असा मोठा परिवार होता.

उंबराच्या झाडाला गळफास

शेतीसाठी काढलेले कर्ज फेडण्याच्या विवेचनेतून निफाड तालुक्यातील जिव्हाळे येथील शेतकरी बाबुराव निवृत्ती तांबे (वय ५५) यांनी सतत नापिकी व कर्जाला कंटाळून तसेच गुरुवारी रात्री उशिरा आपल्या  घराजवळील उंबराच्या झाडाला  गळफास घेऊन आत्महत्या केली ही बाब शुक्रवारी पहाटे निर्देशनात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐकावं ते नवलच! चक्क सरबतावर लावला 'गॅस क्रायसिस चार्ज', लिंबू गरम करून वापरला का? युजर्सचा सवाल

अबरार अहमदला करारबद्ध करणाऱ्या काव्या मारनच्या SRH ला सुनील गावस्करांनी सुनावले; म्हणाले, या पैशातून ते आपले जवान मारतात...

Crime: पत्नीवर नको तो संशय, व्यावसायिक पती संतापला, रागाच्या भरात धक्कादायक कृत्य; मुंबईत खळबळ

Latest Marathi Update : पवना नदीत पोहायला गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

Numerology Predictions : १६ मार्चपासून मूलांक १ ते ९ साठी पैसाच पैसा; पण करिअर अन् आरोग्य कसं असेल? पाहा तुमच्या भाग्यात काय लिहिलय

SCROLL FOR NEXT