farmer 3.jpg
farmer 3.jpg 
नाशिक

प्राप्तिकरपात्र शेतकऱ्यांवर संकट! पीएम रक्कम परतीसाठी नोटीस; रक्कम  न दिल्यास गुन्हे दाखल

माणिक देसाई

निफाड (जि.नाशिक) : तालुक्यातील शासनाच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी म्हणून शासनाची रक्कम घेतलेल्या प्राप्तिकरपात्र एक हजार ६४० लाभार्थींना अदा केलेल्या रकमा परत करण्याची नोटीस तहसील प्रशासनाने बजावली आहे. संबंधित लाभार्थींनी सात दिवसांत तलाठी कार्यालयात रोख अथवा धनादेशाने रक्कम अदा न केल्यास प्राप्तिकर पात्र असूनही रक्कम घेऊन फसवणूक केल्याबाबत गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले. 

प्राप्तिकरपात्र शेतकऱ्यांना रकमा परत करण्याची नोटीस;
तहसीलदार घोरपडे यांनी सांगितले, की केंद्र सरकारने किसान सन्मान योजना- २०१९ सुरू केली. निफाड तालुक्यातील ५५ हजार २७० शेतकरी बांधवांनी याकरिता नोंदणी केली. त्यातील प्राप्तिकर विभागाच्या वतीने पडताळणी होऊन एक हजार ६४० लाभार्थी प्राप्तिकरपात्र असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना अदा केलेल्या रकमा सात दिवसांत आपल्या गावच्या तलाठी कार्यालयात रोख अथवा धनादेशाने जमा करून त्याची पावती घ्यावी. या मुदतीनंतर शासनाची रक्कम फसवणूक करून खात्यावर घेतल्याबाबत गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. 

नोटीस बजावली म्हणून कोतवालास शिवीगाळ 
लासलगाव : कानळद (ता. निफाड) येथील कोतवाल अमोल बाळासाहेब चिताळकर यांनी मोबाईल क्रमांकावरून कानळदचे नारायण श्रीपत जाधव यांना बारा हजार रुपये रक्कम मागणी करणारी नोटीस त्यांचा मुलगा सतीश जाधव यांना पाठवली. त्याचा राग येऊन रविवारी (ता.२५) दुपारी ४. ११ वाजता कोतवाल यांच्या मोबाईलवर नारायण जाधव यांनी नोटीस का दिली या कारणावरून शिवीगाळ केली. या प्रकरणी कोतवाल चितळकर यांच्या तक्रारीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हवालदार ठोंबरे तपास करीत आहेत.  

संपादन - ज्योती देवरे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT