hemant godse.jpg 
नाशिक

खासदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरताच शेतकऱ्यांचा सुटला प्रश्न; वाचा नेमके काय घडले?

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (निफाड) कांद्याच्या बियाण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकरी भल्या पहाटेपासून 'एनएचआरडीएफ'च्या केंद्रात रांगा लावून उभे राहतात... मात्र, त्यांना बियाणे तर मिळत नाहीच, उलट बियाणे संपल्याचा फलक लावला जातो. त्याचवेळी एका तक्रारीची दखल घेत खासदार हेमंत गोडसे अधिकाऱ्यांना धारेवर धरतात अन्‌ कांदा उत्पादकांना तब्बल १३४ किलोग्राम कांदा बियाणे उपलब्ध होते..! चितेगाव (ता. निफाड) येथील संशोधन केंद्रात शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २५) हा अनुभव घेतला. 

अधिकाऱ्यांना धारेवर धरले

गेल्या चार-पाच दिवसांपासून बियाणे वाटपाबाबत प्रचंड तक्रारी आहेत. भाववाढ, बियाणे पुरेसे न मिळणे, इतर पोषके घेण्याची सक्ती, वाटपाचे नियोजन नाही असे या तक्रारींचे स्वरूप आहे. बियाणे घेण्यासाठी शेतकरी भल्या पहाटेपासूनच रांगा लावत होते. यासंदर्भात राजेंद्र डोखळे यांनी सोमवारी (ता. २४) खासदार गोडसे यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्यावर गोडसे यांनी तातडीने चितेगाव केंद्राशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वाटपाच्या सूचनाही दिल्या होत्या. तरीही मंगळवारी (ता. २५) जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांना 'बियाणे संपले', असा फलक बघावयास मिळताच त्यांचा संताप झाला. यापैकी काहींकडे वाटपाचे टोकणही होते. ही बाब पुन्हा डोखळे यांच्यांपर्यंत व त्यांच्यामार्फत खासदार गोडसेंपर्यंत पोचताच त्यांनी थेट चितेगाव गाठले. विशेष म्हणजे, या दोघांनाही काही वेळ प्रवेशद्वारावर ताटकळत थांबावे लागले. त्यानंतर बियाणे सहसंचालक डॉ. आर. सी. गुप्ता हे भेटीस आले व त्यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. 

बैठकीनंतर उपस्थित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना गोडसे यांनी बियाणे ठेवलेल्या वाटप केंद्रात भेट दिली असता, तेथे १३४ किलो ग्रॅम बियाणे आढळले. त्यावर हे सर्व बियाणे उपस्थित शेतकऱ्यांना विनाअट वाटप करा, असा आदेश देत गोडसे यांच्या हस्ते एका शेतकऱ्यास बियाणे बॅग वितरित करण्यात आली. साधारणतः साठ ते पासष्ट शेतकऱ्यांना त्यामुळे बियाणे मिळाले. तसेच, अजूनही बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी मागणी नोंदविण्याची सूचनाही गोडसे यांनी केली. त्यावर २० क्विंटल बियाणे मागविले जाईल, असे अश्‍वासन डाॅ. गुप्ता यांनी दिले. दरम्यान, यापैकी बहुतांश बियाणे हे एनएचआरडीएफतर्फे व्ही. आय. पी. कोटा म्हणून राखीव ठेवण्यात येणार होते. मात्र, ते शेतकऱ्यांमध्ये वाटप करावे लागले.  

या वेळी संजय पिंगळे, प्रभाकर माळोदे, चंद्रकांत कुशारे, संजय गिते, देवीदास सोनवणे, संदीप थेटे, दिलीप बोडके, संदीप मोगरे, कार्लेकर आदी शेतकरीही उपस्थित होते. बैठकीत गोडसे यांनी कांदा बियाणे साठा, शिल्लक, वाटप रजिस्टर, बियाण्यांचा भाव, बीजसंरक्षक घेण्याची सक्ती याबाबत संबंधितांना धारेवर धरले. अधिकारी देत असलेली माहिती गोलमाल असल्याची तक्रारही बैठकीत केली गेली. अखेर शिल्लक असलेला साठा उपस्थित शेतकऱ्यांना वाटप करा, असा आदेशच खासदार गोडसे यांनी दिला. फक्त बियाणेच द्या, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil : आमदार सतेज पाटील यांची 'वाट' बिकट; नगरपालिकांच्या निकालाने बदलले समीकरण, काय असणार पुढची रणनीती?

WTC 2027 Final : न्यूझीलंडचा विजय अन् टीम इंडियाच्या फायनलचा मार्ग बंद; ऑस्ट्रेलियासोबत किवींची Point Table मध्ये मजबूत पकड

आजचे राशिभविष्य - 22 डिसेंबर 2025

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT