maize.jpg 
नाशिक

'परवड थांबणार कधी?'...मका विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या हाती प्रतीक्षाच!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (देवळा) शेतात राबराब राबून शेतकऱ्यांनी मका पिकविला. मात्र, मका विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. विक्रीसाठी माझ्या नंबर कधी येईल? अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मका खरेदी केला जात असला, तरी खरेदीत गती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

मका कुठे झाकावा प्रश्‍नच...

मका खरेदी जलद व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे. कसमादे भागात मका मुख्य पीक आहे. खरीप व रब्बी हंगामात मका पीक घेतले जाते. यंदा कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय मागे पडला आणि मक्‍याचे भाव घसरले. या पार्श्‍वभूमीवर शासकीय मका खरेदी सुरू झाली, तरी ती अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. आवकेच्या तुलनेत वजन काटे नसल्याने खरेदीला गती नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मका साठवणुकीसाठी बारदान नसल्याने मका खरेदीस ब्रेक लागला होता. त्यामुळे मका खरेदीस वेग येत नसल्याने आपला नंबर केव्हा येईल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पेरणीचे दिवस असल्याने मका कुठे झाकावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी मका घरात टाकला आहे. त्यामुळे घरात अडचण होत असली, तरी दुसरा पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

मका विक्रीसाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे इतर कामे होत नाहीत. आता पेरणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे मका खरेदी जलद व्हावी. - शांताराम निकम, खुंटेवाडी (ता. देवळा) 

मका खरेदीसाठी शासनाच्या पुरवठा विभागाने तत्काळ बारदान उपलब्ध करून द्यावे, तसेच वजन काट्यांची संख्या वाढवावी आणि सुटीच्या दिवशीही खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. - कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"ट्रम्पला ठार मारणे हे आपले कर्तव्य!" ; इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीवेळी चिथावणीखोर घोषणाबाजी, मोठ्या प्रमाणात गर्दी

Nitesh Rane Non Bailable Warrant : नितेश राणेंना गोवा पोलिस अटक करणार? अजामीनपात्र वॉरंट; टोलनाका तोडफोड प्रकरणात न्यायालयाची कारवाई

Ramdas Athawale: ठाकरेंनी रामरक्षा नव्हे तर ‘शिवसेना रक्षा’ आंदोलन करावे; मंत्री आठवलेंचा टोला

AUS W vs ENG W Final: आज महिला टी-20 विश्वचषक फायनल; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल मॅच... महामुकाबला

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

SCROLL FOR NEXT