farmer vanchit.jpg 
नाशिक

विम्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात; ऐन दिवाळीत धरणे धरण्याचा इशारा 

मंगेश शिंदे

काळुस्ते (जि.नाशिक) : ऑक्टोबरमधील अवकाळी पावसाने २० ते २५ तारखेदरम्यान इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत भातशेतीसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची विमा कंपन्या दखल घेत नसल्याने ऐन दिवाळीत इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. विमा कंपन्यांविरोधात शेतकरी महामार्गावर धरणे आंदोलन करतील, असा इशारा बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग शिंदे यांनी दिला.

शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण

ऑक्टोबरअखेर ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानभरपाईबाबत दावा केला असेल, त्यांना पात्र ठरवून विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह विमा कंपनी प्रशासनाकडे केली आहे. त्यात, भारतीय जनरल विमा कंपनीची यंत्रणाही विस्कळित होऊन टोल फ्री क्रमांकावर संपर्क करूनही दूरध्वनी लागत नव्हते. मोबाईल टॉवरही बंद पडल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या. विमा कंपनीकडून जनजागृतीही झाली नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील पीकविमाधारक असंख्य शेतकरी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT