Court Order
Court Order esakal
नाशिक

मारहाणप्रकरणी बाप-लेकास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सुरक्षारक्षकास केलेल्या मारहाणीमुळे जिल्हा सत्र न्यायालयाने यातील आरोपींना सहा महिने सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (Father son sentenced to 6 months hard labor in case of beating security guard nashik Latest Marathi News)

आठ मार्च २०१४ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास गायकवाड नगर भागातील बाफना हाऊस येथे सीताराम विठ्ठल साबळे (वय ५२ , तिडके कॉलनी) आणि संदीप सीताराम साबळे (वय २५) यांनी बाफना हाऊस येथील वॉचमन परमेश्‍वर खंदारे (वय २३, ) यास तू पार्किंगमधील लाइट का बंद केली नाही? या कारणावरून काठीने मारहाण करत त्याच्यावर ब्लेडने खांद्यावर, डोक्यावर वार करत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस उपनिरीक्षक आर.डी. पवार यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत आरोपींविरुद्ध सबळ पुरावे जमा करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (ता.२) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एम.गादिया यांच्या न्यायालयात झाली असता आरोपीविरुद्ध फिर्यादी, पंच आणि साक्षीदार यांनी दिलेली साक्ष, तपासी अधिकारी यांनी सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरत संदीप साबळे यास सहा महिने सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ॲड. एस.आर.सपकाळे यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT