fathers murder.jpg 
नाशिक

सुनेला वाचविण्यासाठी 'ते' पुढे सरसावले!...तर मुलाने त्यांनाच

सकाळवृत्तसेवा

नाशिक : निफाड (नैताळे) येथून जवळच असलेल्या सोनेवाडी बुद्रुक (ता. निफाड) येथील निवृत्ती निरभवणे (वय 73) या वयोवृद्ध वडिलांचा मुलगा बबन निवृत्ती निरभवणे याने डोक्‍यात कुऱ्हाड घालून खून केला. निफाड पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, निफाड न्यायालयात हजर केले असता, गुरुवार (ता. 20) पर्यंत न्यायाल याने पोलिस कोठडी सुनावली. 

असा आहे प्रकार

या प्रकरणी कमलेश निरभवणे (53) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आम्ही तिन्ही भाऊ आणि आई-वडील वेगवेगळे राहतो. माझ्या घराशेजारी माझी आई आणि वडील राहतात. माझा भाऊ बबन निरभवणे रोज पत्नीसोबत भांडण करायचा. तसेच, पत्नीवर संशय घ्यायचा. याबाबत त्याला अनेकदा समजावूनही बबन सवय बदलत नव्हता. 15 दिवसांपूर्वी बबन आणि त्याची पत्नी यांच्यात कडाक्‍याचे भांडण झाले होते. बबन पत्नी व मुलांना मारहाण करीत असल्याने पत्नी सरला दोन्ही मुलांसह सासरे निवृत्ती निरभवणे व सासूबाई यांच्याकडे आली होती. सोमवारी (ता. 17) रात्री आठच्या सुमारास बबन हातात कुऱ्हाड घेऊन बायकोला शिवीगाळ करत आला. बबनला आई-वडिलांनी समजावून सांगितले. मात्र, बबन ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. यादर म्यान, बबनने कुऱ्हाड पत्नीच्या दिशेने उगारत तिच्या अंगावर धावून गेला. याचवेळी वडील निवृत्ती निरभवणे यांनी बबनला धक्का देत सून सरलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. याचा राग मनात धरून बबनने वडील निवृत्ती निरभवणे यांच्या डोक्‍यातच कुऱ्हाडीचा घाव घातला. वडील रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळले. नंतर बबनने तिथून पळ काढला. वडिलांच्या डोक्‍यातून अतिरक्तस्राव झाल्याने त्यांची जागेवरच हालचल बंद झाली होती. 

याबाबत माहिती मिळताच निफाडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे, उपनिरीक्षक अमोल पवार, हवालदार पी. एन. निचळ, नितीन मंडलिक, एम. एम. देशमुख आदींनी रात्री बारादरम्यान सोनेवाडी नैताळे रोडवर संशयिताला अटक केली. याबाबत निफाड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे तपास करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT