Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime News : महिला डॉक्टरला ऑनलाइन 1 लाख 43 हजाराचा गंडा!

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर भामटे अनेक कृल्प्त्या वापरत असून बँकेच्या संदर्भात माहिती मिळवण्याच्या बहाण्याने येथील महिला डॉक्टरला ऑनलाइन तब्बल १ लाख ४३ हजार रुपयांना चुना लावला असून खात्यावरील ही रक्कम लंपास झाली आहे. (Female doctor cheats of 1 lakh 43 thousand online Nashik Cyber ​​Crime News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला शहरात थेटर रोड परिसरात होमिओपॅथीचा व्यवसाय करणाऱ्या डॉ. मंजुषा भालेराव यांना अज्ञात ऑनलाइन चोरट्याने कॉल करून क्रेडिट कार्डचा वापर केला नाही तर फाईन लागेल असा बनाव केला. फाईन रद्द करण्यासाठी बोलण्यात गुंग ठेवत नकळत कार्डचे डिटेल मागून घेतले.

यानंतर या चोरट्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून डॉ. भालेराव यांच्या क्रेडिट कार्डद्वारे एक लाख ४३ हजार २६७ रुपयांची खरेदी केली. या घटनेने खळबळ उडाली असून डॉ. भालेराव यांच्या तक्रारीवरून चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT