Tai Binnore esakal
नाशिक

Nashik News : घोटी खुर्दच्या महिला सरपंच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्र घोषित!

ज्ञानेश्वर गुळवे

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी अपात्र घोषित केल्याचा आदेश दिला आहे. (Female Sarpanch of Ghoti Khurd declared ineligible by Upper District Collector Nashik News)

याप्रकरणी शिवाजी एकनाथ फोकणे यांनी निवडणुक विवाद अर्ज दाखल केला होता. त्याबाबत वेळोवेळी सुनावणी कामकाज घेऊन पुरावे अवलोकन करण्यात आले. त्यानुसार सरपंच ताई बिन्नर यांचे पती आणि सासरे यांच्या नावावर अनुक्रमे नऊ हजार व तीन हजारांची धनादेशाने रक्कम काढण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या पोटकलम १४ ग नुसार उर्वरित काळासाठी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य पदावरून अनर्ह ठरवण्यात आले आहे. तत्कालीन थेट सरपंच मंदाकिनी विष्णुपंत गोडसे यांना अपात्र ठरवल्यानंतर ताई बिन्नोर ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्या पायउतार झाल्या आहेत.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सरपंच ताई बिन्नोर यांचे पती माणिक बिन्नोर, सासरे निवृत्ती बिन्नोर यांच्या नावावर धनादेशाने ग्रामपंचायतीची रक्कम अदा केली असल्याचा गंभीर आरोप शिवाजी एकनाथ फोकणे यांनी केला होता. ह्या निवडणूक दाव्याची सुनावणी मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांच्या न्यायालयात घेण्यात आली.

प्रस्तुत प्रकरणी दोन्ही पक्षकारांना उचित संधी देऊन सुनावणीचे कामकाज करण्यात आले. उपलब्ध कागदोपत्री पुरावे, दोन्ही बाजूची भूमिका आदी बाबी विचारात घेऊन सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना अनर्ह ठरवल्याचा आदेश काढण्यात आला आहे.

घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदावरून त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

"सरपंच पदाचा कुठल्याही प्रकारे गैरवापर केलेला नसून विरोधकांकडून खोट्या प्रकरणी आम्हाला गोवण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्धारित केलेल्या दिवसांमध्ये आम्ही निर्दोष असल्याचे सिद्ध करुन दाखवू." -ताई बिन्नोर,माजी सरपंच घोटी खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : जळगाव शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

SCROLL FOR NEXT