cow 1.jpg 
नाशिक

धक्कादायक! सात महिन्याच्या गाभण गायीच्या पोटातून हे काय निघाले?

आनंद बोरा :सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गाय हा रवंथ करणारा पाळीव प्राणी..खाता खाता तिच्या पोटात काय जाते हे देखील तिला माहित नसते..त्यात सात महिन्याची गाभण..अशातच गायीच्या पोटात काय आढळले माहिती आहे तुम्हाला? वाचून धक्काच बसेल. 

बापरे हे काय सापडले?

चक्क 50 किलो प्लॅस्टिक, तीन नाणी, काच, सुई, खडे, लोखंडाचा तुकडा, वायर. इतके साहित्य (फॉरेन बॉडी) सात महिन्यांच्या गाभण गायीच्या पोटातून काढण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप नेर आणि डॉ. संदीप पवार यांनी डीजीपीनगर पाटाजवळील ठकाजी खेमनार यांच्या घरी जाऊन तीन तासांमध्ये होस्टन जर्सी गायीच्या पोटाची ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. 

तीन तास शस्त्रक्रिया; "फॉरेन बॉडी'मुळे गायी संकटात 
शहरातून फिरणाऱ्या व कचराकुंडीजवळ चरणाऱ्या गायी प्लॅस्टिक पिशव्यांद्वारे फेकला जाणारा भाजीपाला, शिळे अन्न खातात. प्लॅस्टिक पिशव्या खाल्ल्यावर त्या हलक्‍या असल्याने सुरवातीला वरच्यावर तरंगतात. रवंथ करताना त्या भटक्‍या जनावरांच्या तोंडातून बाहेर पडताना दिसतात. जनावरांचे मालक मोठ्या कौतुकाने आमची गाय प्लॅस्टिक पिशव्या बाहेर फेकते, असे सांगतात. पण, गायीच्या पोटात हळूहळू प्लॅस्टिक कचरा साठत जाऊन तिला अशक्तपणा येतो. दूध कमी देऊ लागते. पचनक्रियेत अडथळे येतात. पोटाचा नगारा वाढलेला दिसतो. काही कालावधीनंतर त्यांना जीव गमवावा लागतो. प्लॅस्टिकबंदी असूनदेखील या पिशव्या येतात कशा, असा प्रश्‍न उपस्थित होतो. शेकडो पिशव्या पोटात गेल्यामुळे "फॉरेन बॉडी'चा गंभीर प्रकार शहरात पाहावयास मिळत आहे. 
 
मृत्यूला आमंत्रण 
गाय हा रवंथ करणारा पाळीव प्राणी. तिचे पोट चार भागात (एक मोठे व तीन लहान) विभागलेले असते. मोठ्या भागात चारा साठवला जातो. निवांतवेळी ती रवंथ करते. साठवणीच्या भागात रोज खाण्यात येणाऱ्या पिशव्या जमा होतात. त्या पचत नाहीत आणि मग त्यातून जनावरांना मृत्यूचे आमंत्रण मिळते. 

"फॉरेन बॉडी'ची समस्या

नाशिकमध्ये भटक्‍या जनावरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे "फॉरेन बॉडी'ची समस्या जाणवत आहे. पन्नास किलो प्लॅस्टिक काढलेल्या गायीची तब्येत चांगली आहे. -डॉ. प्रदीप नेर, पशुवैद्यकीय अधिकारी 

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

प्लॅस्टिकबंदी असताना शहरातील कचराकुंड्यांवर प्लॅस्टिक पिशव्या दिसतात. गुरे पाळणारे आपली जनावरे रस्त्यात सोडून देतात. मग ते गावभर फिरत असताना भाविक नैवेद्य पिशवीसह देतात. प्लॅस्टिकसह नैवेद्य खाल्ला जातो. आठ ते दहा वर्षांत त्यांच्या पोटात इतके प्लॅस्टिक जमा होते, त्यामुळे जिवाला धोका पोचू शकतो. -डॉ. संदीप पवार, वैद्यकीय अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT