laghushanka.jpg 
नाशिक

भयानक! लघुशंका करताना हटकले.. भरसंतापात शस्त्राने थेट मानेवर वार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वणी : येथे लघुशंका करू नका, म्हणून एका व्यक्तीनी यांनी विकास यास हटकले असता त्याचा राग येऊन विकास पवार याने त्या व्यक्तीला शिवीगाळ करून फायटरने मारण्यास सुरवात केली.

काय घडले ?

वणी येथील मोठा कोळीवाडा भागातील किल्ला चौकात मंगळवारी (ता.30) रात्री साडेदहाला तक्रारदार सोमनाथ श्रीखंडे कोळीवाडा परिसरातील किल्ला चौकात बसलेले असताना संशयित विकास पवार किल्ल्याच्या बाजूला लघुशंका करत होते. येथे लघुशंका करू नका, म्हणून श्रीखंडे यांनी विकास यास हटकले असता त्याचा राग येऊन विकास पवार याने श्रीखंडे यांना शिवीगाळ करून फायटरने मारण्यास सुरवात केली. या वेळी भांडण मिटवण्यासाठी सोमनाथ यांचा भाऊ देवीदास श्रीखंडे, भास्कर श्रीखंडे आणि भाचा राहुल गांगोडे गेले असता संशयित विकास पवार याचा भाऊ कांतिलाल पवार, दैनिक पवार, राहुल पवार यांनीही श्रीखंडे बंधूंना आणि त्याच्या भाच्यास लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरवात केली. यात संशयित राहुल पवारने आपल्याजवळील धारधार शस्त्राने राहूल गांगोडे यांच्या मानेवर वार करत गंभीर जखमी केले. याबाबत पोलिसांना कळताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत जखमीस नाशिकला उपचारासाठी पाठविले. समाधान श्रीखंडे यांच्या तक्रारीवरून सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.  

शस्त्राने एकाच्या मानेवर वार

लघुशंका करण्यास हटकल्याचा राग आणि जुन्या वादावरून येथील मोठा कोळीवाडा चौकात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यात संशयिताने धारधार शस्त्राने एकाच्या मानेवर वार करत गंभीर जखमी केले. पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर

Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

Chhatrapati Sambhajinagar: गॅससाठी नागरिकांच्या रांगा कायम; आठ दिवसांत प्रश्न सुटू शकतो, पण पुरवठा वाढवा ः एजन्सी

Mugdha Karnik Controversy: अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी माफी मागावी; श्री विठ्ठल भक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्य, मंदिर समितीचे पत्रक प्रसिद्ध!

Chhatrapati Sambhajinagar: कांदा अवघा ७०० रु. क्विंटल; शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, हमीभाव देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT