water supply latest marathi news esakal
नाशिक

Nashik : अखेर पंचवटीतील पाणीपुरवठ्यात सुधारणा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटी परिसरातील गणेशवाडीसह टकलेनगर, जुना आडगाव नाका भागात काही दिवसांपासून नळाला दुर्गंधीयुक्त गटारमिश्रित (Sewage water) पाणी येत होते.‘याबाबत ‘सकाळ’ने केलेल्या मागणीची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवून हा दोष दूर केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. (Finally improvement in water supply in Panchavati nashik latest marathi news)

आठवड्यापासून पंचवटीतील अनेक भागात नळाला दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत होते. याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवत संबंधित यंत्रणेकडे नागरिकांसाठी शुद्ध पाणीपुरवठ्याचा आग्रह धरला होता.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पंचवटीतील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नरेंद्र शिंदे व कनिष्ठ अभियंता दत्तात्रय बागूल यांनी सातत्याने पाठपुरावा करत लिकेज शोधून काढले. त्यामुळे नळाला स्वच्छ पाणी येऊ लागले आहे.

‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश

गणेशवाडी, सहजीवननगर हा भाग कष्टकरी वस्तीचा असून, शेजारीच टकलेनगर, श्रीकृष्णनगर, अशी मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. या भागात गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू होता. याविषयी परिसरातील नागरिकही त्रस्त झाले होते.

अनेकांनी आजार नको, म्हणून चक्क विकतच्या पाण्याला पसंती दिली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी परिसरातील अनेक गटारींची चेंबर्स काढून लिकेज शोधून काढले. आता नळाला दुर्गंधीमुक्त पाणी येऊ लागल्याने रहिवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

"नळाला दूषित पाणी येत असल्याने महापालिका प्रशासनानेही ही बाब गांभीर्याने घेतली. त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने लिकेज शोधून काढल्याचे समाधान आहे."

-दत्तात्रय बागूल, कनिष्ठ अभियंता, पंचवटी विभाग पाणीपुरवठा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT