नाशिक

Nashik Fire Accident: चारा वाहतूक करणाऱ्या कडब्याला आग; अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात

- दीपक खैरनार

Nashik Fire Accident : येथील शिवबाण फाट्यानजीक जनावरांसाठी चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीमधील कडब्याला आग लागल्याने नुकसान झाले असून फटाक्यामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. (fire breaks out in trolley carrying fodder for animals nashik fire accident news)

आसखेड्याहून काडगाव (ता.चांदवड) येथे शेतकरी जनावरांसाठी चारा घेऊन जात होते. शिवबाण मित्रमंडळाचे तरूण व अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. चालकाच्या प्रसंगवधाने सुदैवाने जिवितहानी टळली.

जनावरांच्या चाऱ्यासाठी पशुपालक चारा जेथे उपलब्ध होईल तेथे धाव घेत आहेत. येत्या उन्हाळ्यात जनावरांवर उपासमार होणार असल्याने शेतकरी उपाययोजनांवर भर देत आहेत. मंगळवार (ता.१४) रात्री साडेआठच्या सुमारास शेतकरी गणेश सोनू लकधीरे (रा.काडगाव,ता.चांदवड) हे आसखेड्याहून ट्रॉलीमधून चारा घेऊन जात असतानाच अज्ञातांनी रस्त्यावर फटाके फोडले.

ट्रॉलीमधील चाऱ्यावर ठिणगी पडली ही बाब चालक गणेश लकधीरे यांच्या लक्षात येताच रस्त्यावरील वाहतूकीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते सदर ट्रॅक्टर अंबासन शिवारातील शिवबाण फाट्यावर येत असतांनाच आगीने रौद्र रूप धारण केले होते.

शिवबाण फाट्यावरील तरूणांना माहिती मिळताच त्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले व आगीच्या लोळातुन ट्रॅक्टर सुखरूप बाहेर काढला. काही वेळातच अग्निशमनदलाने आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली.

व पुढील अनर्थ टळला. यावेळी सटाणा अग्निशमन दलाचे विभाग प्रमुख संदिप पवार, चालक दत्तात्रय नंदाळे, सहाय्यक फायरमन आतीश गायकवाड, योगेश नंदाळे, राजू आहीरे, विवेक देवरे लवाजम्यासह घटनास्थळी हजर झाले. दरम्यान शिवबाण ग्रुप व शेतीशिवारातील शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

"चालकाने समयसूचकता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. सणासुदीत रस्त्यावरील रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे. तरूणांनी रस्त्यावर फटाके फोडू नयेत म्हणजे कुठलेही नुकसान होणार नाही." -भुषण भामरे, शिवबाण ग्रुप अंबासन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

SCROLL FOR NEXT