pimplegaon fire.jpg 
नाशिक

गादी कारखान्यात आगीचे रौद्ररूप ...चिंधी कापूस भस्मसात!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पिंपळगाव बसवंत,शमीन हाजी अहमद पिंजारी यांचा गादी कारखाना खाक झाला. शहरातील बाबा मंगल कार्यालय परिसरात लागलेल्या भीषण आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. गाळ्यांमधील असलेल्या गाद्यांचा चिंधी कापूस पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना बुधवारी (ता. 22) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पिंपळगाव अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. ओझर एचएएलच्या अग्निशमन दलाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळविले. दोन तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्‍यात आली. 

पाच लाख रुपयांचे नुकसान.. 

बाबा मंगल कार्यालयालगत असलेल्या पत्र्यांच्या गाळ्यांना शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. आगीत गाद्यांच्या चिंधी कापसासह गाळ्यांचे पत्रे पूर्णपणे खाक होत गाळ्यांचे मोठे नुकसान झाले. ज्वलनशील कापड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. पिंपळगाव अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंबातील पाणी संपल्याने गाडी दोनदा भरूनही आगीचे लोळ कायम होते. नंतर ओझर एचएएलच्या फायरप्रूफ अग्निशमन दलाच्या बंबाने अवघ्या काही क्षणांतच आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी मोठे नुकसान झाले आहे. 

ग्रामपालिकेला नवीन बंब देण्यात हरकत नाही
पिंपळगाव बसवंतची लोकसंख्या पाहता अग्निशमन बंबाची क्षमता कमी आहे. ओझर व नाशिकहून बंब येण्यासाठी 30 मिनिटे लागतात. तोपर्यंत नुकसान जास्त होते. ग्रामपालिका निधीसाठी कमी पडते. बाजार समितीने ग्रामपालिकेला नवीन बंब देण्यात हरकत नाही. - महेंद्र गांगुर्डे, माजी सरपंच, पिंपळगाव बसवंत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT