malegaon fire 1.jpg 
नाशिक

VIDEO : अग्नितांडव! गोदामास भीषण आग.. दीड कोटींच्या नुकसानीचा अंदाज

प्रमोद सावंत: सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मालेगाव  शहराजवळील चाळीसगाव फाट्यानजीकच्या लोणवाडे शिवारातील जीवनराम लेगा यांच्या मालकीच्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट गुदामाला भीषण आग लागली. शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

असे घडले सर्व..

आगीत सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 लोणवाडे शिवारात लेगा यांचे ट्रान्सपोर्ट गोदाम आहे. गोदामाच्या दर्शनी भागात ट्रकमध्ये माल भरण्याचे काम सुरु होते. सायंकाळी पाठीमागील भागातून अचानक गोदामातून धूर निघू लागला. कामगारांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी महापालिका अग्निशामक दलाला माहिती कळविली. गोदामानजीकच तालुका पोलिस ठाणे असल्याने पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्षणार्धात अग्निशामन अधिक्षक संजय पवार व सहकारीही अग्निशामक बंबासह दाखल झाले. महावितरणने परिसरातील वीजपुरवठा खंडीत केला. गोदामात सूत, पॉलिस्टर व सूत कॉईन्स असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. धूर व आगीचे लोळ सात किलोमीटर अंतरापर्यंत दिसून येत होते. आगीचे स्वरुप पाहुन अतिरिक्त बंब मागविण्यात आले. शुक्रवार असल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

आगीत सुत कॉइन्स, पॉलीस्टर, ग्रे धागा, सूत, वीज उपकरणे, फर्निचर आदी कोट्यावधीचा ऐवज जळून खाक झाला. महापालिका अग्निशामक दलाच्या सर्व सात बंबांनी वीसपेक्षा अधिक फेऱ्या करुनही रात्री साडेआठपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. कामगार व काही मदत करणाऱ्या तरुणांनी गुदामातील माल बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली. गुदामाच्या पुढील भागात असलेला लाखो रुपयांचा माल वाचविण्यात यामुळे यश आले. आगीचे निश्‍चित कारण व नुकसानीचा अंदाज समजू शकला नाही. तालुका पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT