onion price 4.jpg
onion price 4.jpg 
नाशिक

बांगलादेशकडून कांद्यावर पाच टक्के आयात शुल्क; नवीन लाल कांद्याच्या भावातही उसळी 

महेंद्र महाजन

नाशिक : स्थानिक आणि पश्‍चिम बंगालसह गुजरातमधून येणाऱ्या नवीन कांद्याच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशने कांद्याच्या आयातीवर पाच टक्के शुल्क लागू केल्याची माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत धडकली आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये पाठवल्या जाणाऱ्या कांद्याच्या भावात एक ते दीड रुपयांनी वाढ होणार आहे. भारताने १ जानेवारीपासून निर्यात खुली केल्यानंतर देशातून पाठविण्यात आलेल्या कांद्याच्या जवळपास २० ट्रकभर कांदा तीन दिवसांपूर्वी बांगलादेशच्या सीमेपर्यंत पोचला होता. 

नवीन लाल कांद्याच्या भावात उसळी 
अवकाळी पावसाने रोपांसह काढलेल्या नवीन लाल कांद्याचे नुकसान झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता.८) सकाळी जिल्ह्यातील बाजारपेठांमधून कांद्याची आवक काहीशी मंदावली होती. त्यामुळे भावाने उसळली घेतली. सकाळच्या सत्रात चांगला भाव मिळतोय म्हटल्यावर सायंकाळपर्यंत बाजारपेठांमधील आवक सकाळच्या तुलनेत तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढली होती. त्यामुळे पुन्हा भावात घसरण झाली. तरीही दिवसभरातील कांद्याच्या लिलावात गुरुवारच्या (ता. ७) तुलनेत आज क्विंटलला १०० ते ३५० रुपयांनी उसळी राहिली. पावसामुळे भिजलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारात आणल्यास त्याचा भावावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तीन दिवसांत कांद्याचे भाव काय राहणार? याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तरीही या महिन्यात नवीन लाल कांद्याला चांगला भाव मिळेल, असा अंदाज कृषी अभ्यासकांना वाटत आहे. 


कांद्याची निर्यात खूपच मंद 
कांद्याच्या निर्यातीला सुरवात झाल्यापासून आठवडाभरात निर्यात खूपच मंद राहिली आहे. मुंबईच्या बंदराकडे १७४ ते १८५, तर तुतीकोरीनच्या बंदराकडे १७० ते २०० कंटेनरभर कांदा निर्यातीसाठी रवाना झाला. मार्चमध्ये कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयातून जागतिक बाजारपेठेला चीनसह पाकचा कांदा खपवण्यासाठी वेळ मिळाल्याने त्यावेळी तुतीकोरीनच्या बंदराकडे ५७० आणि मुंबईच्या बंदराकडे ६५० ते ७०० कंटेनरभर कांदा निर्यातीसाठी रवाना झाल्याची माहिती निर्यातदारांनी दिली. 

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच

नवीन लाल कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे सरासरी क्विंटलला रुपयांमध्ये) 

बाजारपेठ शुक्रवार (ता. ८) गुरुवार (ता. ७) 
येवला ३ हजार २ हजार ६५० 
लासलगाव २ हजार ९०१ २ हजार ८०१ 
चांदवड ३ हजार २ हजार ७५० 
सटाणा २ हजार ५५० २ हजार ३५० 
उमराणे २ हजार ८५० २ हजार ६०० 
पिंपळगाव २ हजार ९०१ २ हजार ६५१ 

हॉर्टिकल्चर प्रोड्युसर एक्स्पोर्टर असोसिएशनची ऑनलाइन बैठक झाली. त्यामध्ये सततच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे परदेशातील ग्राहक तुटत असल्याबद्दलची चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे देशांतर्गत कांद्याचे भाव वाढल्यानंतर निर्यातबंदीचा निर्णय घेण्याऐवजी सरकारने कांद्याच्या आयातीला सवलत द्यावी. ही मागणी केंद्र सरकारपर्यंत निवेदनाद्वारे पोचवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. - विकास सिंह, निर्यातदार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. लातूरमधील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT