coronazone.jpg 
नाशिक

नाशिकमधील 'हे' पाच विभाग 14 दिवसांसाठी प्रतिबंधित...!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : गेल्या काही दिवसात सेफ झोनमध्ये असलेल्या नाशिकमध्ये आज सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज सहाने वाढ झाल्याने महापालिकेच्या वतीने हा भागा 14 दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला.

शंभर मीटरचा परिसर रेड झोनमध्ये समाविष्ट

पाथर्डी फाटा, सावता नगर, उत्तम नगर, सातपूर कॉलनी व पंचवटीतील हिरावाडी परिसराचा समावेश आहे. पाथर्डी फाटा येथील मालपाणी सॅफरॉन ईमारतीपासून तीनशे मीटर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून यात शंभर मीटरचा परिसर रेडझोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हॉटेल एक्‍सप्रेस ईन, सप्तश्रृंगी नगर, श्री रेसिडेन्सी, ज्योतीष सेंटर, दत्त मंदीर, गणराज स्विटस, सावता नगर येथील ब्रम्हाणी किराणा स्टोअर्स केंद्रभूत मानून गुरुदत्त चौक, महालक्ष्मी मंदीर, स्टेट बॅंक एटीएम, खांदे मळा, वैभवी ट्रेडर्स, सुभाषचंद्र बोस गार्डन, सातपूर कॉलनीतील समाज मंदीर, हॉटेल महाराष्ट्र दरबार, एबीएस ईलेक्‍ट्रीकल सर्व्हिसेस तर सिडकोतील उत्तम नगर भागात कल्पतरु हॉस्पिटल, शंकर मंगल कार्यालय, सेवा मेडीकल पर्यंतचा भाग प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

प्रमुख मार्गावर बॅरिकेटींग

पंचवटीतील हिरावाडी येथील राज नगर मधील श्री पार्वती रो-हाऊसचा भाग प्रतिबंधित क्षेत्रात आहे. या भागात प्रमुख मार्गावर बॅरिकेटींग करण्यात आल्या. अत्यावशक्‍य व तातडीची वैद्यकीय सेवा येथे पुरविली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी, बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जाणार असून संपुर्ण भागाचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT