crime 111.png 
नाशिक

भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : काही दिवसांपासून शहरात दहशतीचे वातावरण आहे. त्यापाठोपाठ भररस्त्यात घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिक धास्तावले

वर्दळीच्या रस्त्यावरील घटनेने शहरात एकच खळबळ

विंचूर चौफुली येथील न्यू तृप्ती फरसाणचे संचालक सागर कायस्थ (३५, रा. पटेल कॉलनी) रात्री नऊच्या दरम्यान दिवसभराचा दुकानाचा गल्ला अंदाजे ७० हजार रुपये व व्यापाऱ्यास देण्यासाठी घरून आणलेले दोन लाख रुपये असे एकूण दोन लाख ७० हजार रुपये पिशवीत घेऊन दुचाकीने (एमएच १५/ एफवाय ८३११) घराकडे जात होते. पटेल कॉलनीतील संजीवनी शाळेजवळून रस्त्याने जात असताना मागून तोंडाला काळे कापड बांधून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी सागर यांची दुचाकी आडवली. एकाने दुचाकीच्या हँडलला असलेली पैशाची पिशवी काडून घेतली, तर दुसऱ्याने तलवार मानेस लावून सागर यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची दोन लाखांची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून घेतली. पँटच्या खिशातील दहा हजारांचा मोबाईलही काढून घेतला. झटापटीत दुचाकी खाली पडली, तर सागर यांनी आरडाओरड केल्याने नागरिक जमा होऊ लागताच चोरट्यांनी पळ काढला. सागर कायस्थ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत लुटीचा गुन्हा दाखल झाला.  

शहरात एकच खळबळ

पटेल कॉलनीतील संजीवनी शाळेजवळ दुकान बंद करून घरी जाणाऱ्या फरसाण व्यावसायिकाला तीन चोरट्यांनी भररस्त्यात अडवून तलवारीच्या धाकाने लुटले. यामध्ये तब्बल चार लाख ८० हजारांची लूट झाली असून, वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT