coronavirus.jpg 
नाशिक

BREAKING : चिंताजनक! मालेगावात कोरोनाचा थैमान सुरूच.. आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात होत असलेली वाढ पाहता आता आणखी एक चिंताजनक बातमी आहे. मालेगावात आणखी ५ रुग्णांचे कोरोना पॉझिटिव्ह वाढले आहेत. सकाळी नाशिकमध्ये ४ पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात दिवसभरात १४ नवीन पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता नाशिक जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा ७९ आहे.

नाशिक जिल्ह्याची संख्या आता 79 वर

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 17) मालेगावचे 14 जण कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्ट आले होते. तर, शनिवारी (ता. 18) नाशिक शहरात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले.त्यानंतर मालेगावमध्ये आणखी ५ रुग्ण वाढल्याने जिल्ह्याची संख्या आता ७९ वर पोहोचली आहे.

नाशिक शहरातही कोरोनाबाधितांच्या संख्येत चारने वाढ

नाशिक शहरातही कोरोनाबाधितांच्या संख्येत चारने वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अंबड, संजीवनगर वसाहतीतील वृद्ध महिला कोरोनाबाधित निष्पन्न झाली. त्यामुळे तिच्या घरातील नातलगांना ताब्यात घेत त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये तिचे मुंबई व पुण्याहून आलेल्या दोन मुलांसह चौघांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 79 वर जाऊन पोहोचली आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण
 
तिसऱ्या रिपोर्टची प्रतिक्षा 
दरम्यान, गेल्या 4 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाशिक शहरात गोविंदनगर येथे आढळून आला होता. शहरातील तो पहिला रुग्ण होता. जिल्हा रुग्णालयात तो दाखल होता. 14 दिवसांच्या उपचारानंतर 15 व्या दिवसाचे स्वॅब तपासणीतून निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 16 व्या दिवसाचा तिसरा रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे. या रिपोर्टची आरोग्य विभागाला प्रतिक्षा असून, हाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज केले जाऊन राहत्या घरी 14 दिवस होम क्वारंटाईन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Election: एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा, भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या उंबरठ्यावर! राजकीय भूकंप येणार?

Malnourished Childrens : राज्यात १.३७ लाख मुले कुपोषित

Viral Video: थंडीने गारठलात? 50 रुपयांचा देसी हीटर पाहून तुम्हीही थक्क व्हाल, पाहा व्हायरल व्हिडिओ

CM Devendra Fadnavis : मुंबई महापालिकेत ‘कमळ’ फुलणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्‍वास

Vijay Hazare Trophy live : रोहित शर्माचा पहिल्याच चेंडूवर पुल शॉट अन् झाला बाद; देवेंद्र बोरा चमकला, जाणून घ्या कोण आहे तो

SCROLL FOR NEXT