corona 5.jpg 
नाशिक

BREAKING : चिंताजनक! मालेगावात आणखी ५ पॉझिटिव्ह...जिल्ह्यात धोक्याची घंटा!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मालेगाव परीसरात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. मंगळवारी (ता.14) सायंकाळपर्यंत प्राप्त सर्व 46 अहवालांत संबंधित रूग्णांना कोरोनाची लागण झालेली नसल्याने काहीसा दिलासा मिळाला. परंतु सायंकाळी उशीरा प्राप्त अहवालांपैकी पाच रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याने निदर्शनात आले आहे.

मालेगावमध्ये आणखी पाच कोरोना पॉझिटीव्ह

मालेगाव परीसरात कोरोचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यापूर्वी धुळे येथे उपचारादरम्यान मृत्य युवतीला कोरोना झाला असल्याने मंगळवारी (ता.14) सकाळी प्राप्त अहवालातून निष्पन्न झाले होते. यानंतर दुपारी बाराच्या सुमारास प्राप्त बारा अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यापाठोपाठ दुपारी प्राप्त झालेले 31 अहवालदेखील निगेटीव्ह आल्याने मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु सायंकाळी उशीरा प्राप्त झालेल्या दहा अहवालांपैकी पाच जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने निष्पन्न झाले आहेत. यापैकी दोन महिला व तीन पुरूष आहेत. हे सर्व पाच बाधित यापूर्वी कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्‍ती आहेत. व या पाचही व्यक्‍तींना यापूर्वीच प्रशासनातर्फे क्‍वारंटाइन करण्यात आले होते. त्यामूळे त्यांच्या संपर्कात कुठलीही अन्य व्यक्‍ती न आल्याने कोरोनाला अटकाव घालण्यात यश आलेले आहे. त्यामूळे पोलिस प्रशासनातर्फे मालेगाव व परीसरावर लक्ष केंद्रित करून कोरोना उच्चाटनासाठी प्रयत्न केले जात आहेत.

39 रूग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 41 कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून, एकाला कोरोनामुक्‍त करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलेले आहे. मंगळवारी (ता.14) पाच नवीन बाधित रूग्ण वाढल्याने आता जिल्ह्यात 39 रूग्णांवर मालेगाव व नाशिक येथे उपचार सुरू आहे. यापैकी तीन नाशिक, एक सिन्नर, एक चांदवड व उर्वरित मालेगाव येथील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT