satana markaj suspected.jpg 
नाशिक

दिल्लीहून थेट पाच जणांची कार जेव्हा सटाण्यात पोचते.. तेव्हा मात्र खळबळ!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सटाणा : येथील मालेगाव रस्त्यालगत असलेल्या पुंडलिकनगरमध्ये गुरुवारी (ता. 3) एका खासगी होंडा सिटी वाहनाने मुस्लिम जमातीचे पाच जण दिल्लीहून आल्याने पुंडलिकनगर परिसरात एकच खळबळ उडाली. 

दिल्लीचे पाच जण जेव्हा पोचले सटाण्यात
होंडा सिटी गाडी (डीएल 3, सीबीई 6017)ने पाच जण पुंडलिकनगरमधील एका बंद घरी पोचले. सटाणा पोलिसांनी त्यांना नागरिकांच्या तक्रारीवरून रात्रीच ताब्यात घेतले. तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी गंभीर दखल घेत त्या पाचही जणांना येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. प्राथमिक तपासणीत त्यांना सर्दी-खोकला यांसारखे कोणतेही लक्षण आढळून आले नसल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. तरीही प्रशासनाने त्या पाचही जणांच्या हातांवर होम क्वारंटाइनचा शिक्का मारून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 

सीमा बंद तरीही... 
मात्र, देशभरात राज्य सीमा, जिल्हा सीमा, ओलांडून हे खासगी वाहन सटाणा शहरात पोचले कसे, या एकमेव चर्चेला शुक्रवारी (ता. 5) दिवसभर उधाण आले होते. दरम्यान, या पाच जणांचा कसून शोध घेतला असता, गाडीमालक व चालक दिल्ली येथे ट्रॅफिक पोलिस म्हणून नोकरीस आहे. नातेवाइकाचे निधन झाल्याने भेट देण्यासाठी आले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हे सर्व जण मुस्लिम समाजाचे असल्याने दिल्ली येथील मरकज मेळाव्याचा संशय नागरिक घेत आहेत. त्या पाच जणांना पुंडलिकनगर या वसाहतीत क्वारंटाइन म्हणून ठेवू नये, अशी आग्रही मागणी वसाहतीतील नागरिकांनी केली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..
ग्रामीण रुग्णालयात तपासणीनंतर त्यांची नाशिक जिल्हा रुग्णालयात रवानगी 

सिटी होंडा खासगी वाहनाने सटाणा शहरात दिल्लीहून आलेले पाच जण कोरोनाचे संशयित आहेत की नाही, हे अजून ठरायचे आहे. शहरवासीयांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, योग्य ती कारवाई करू. संशयितांच्या पूर्ण वैद्यकीय चाचण्या करूनच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. -जितेंद्र इंगळे, तहसीलदार, बागलाण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT