marigold.jpg 
नाशिक

राज्यात दरवळणार फुलांचा सुगंध! यंदा फूलशेती लागवड १५ हजारांवरून १८ हजार हेक्टरवर; वाचा सविस्तर

गोकुळ खैरनार

नाशिक : (मालेगाव) कोरोना काळातही घराघरांत मोठ्या उत्साहाने साजरा झालेला गणेशोत्सव पाहता आगामी काळातील नवरात्रोत्सव व दीपोत्सव साजरा होणार आहे. राज्यात नवरात्रीपासून विविध फुलांचा सुगंध दरवळू लागेल. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील फूलशेती १५ हजारांवरून १८ हजार हेक्टरवर पोचली आहे. येत्या दोन महिन्यांत कोरोना नियंत्रणात आल्यास दिवाळीत फुले चांगलाच भाव खाऊ शकतील.

लागवड १५ हजारांवरून १८ हजार हेक्टरवर 
 
राज्यातील गुलाब व इतर फुले देशांतर्गत बाजारपेठेतही पोचणार आहेत. दरम्यान, नाशिकसह विविध जिल्ह्यांमध्ये दसरा सण समोर ठेवून पावसाळी झेंडूची लागवड झाली आहे. कोरोना लॉकडाउनमुळे फूलशेतीचे मोठे नुकसान झाले. देवस्थाने, लग्नसोहळे, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा-जत्रा बंद असल्याने फुलांचा उन्हाळ्यातील सिझन वाया गेला. शेतकऱ्यांनी फुले तोडून बांधावरच फेकली. जवळपास ५० हजार जणांचा रोजगारही गेला होता. कोरोनाशी दोन हात करतानाच फूलशेती पुन्हा उभारी घेऊ पाहत आहे. गणेशोत्सवात मोठा डामडौल नसला तरी घराघरांत हा उत्सव तेवढ्याच थाटामाटात झाला. येत्या काही दिवसांत धार्मिक स्थळे पुन्हा सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 

फूलशेतीत तब्बल तीन हजार हेक्टरने वाढ

आगामी काळात फूल व्यवसायाला पुन्हा बळकटी मिळू शकेल. यातूनच राज्यात फूलशेतीत तब्बल तीन हजार हेक्टरने वाढ झाली आहे. राज्यातील पुणे, कोल्हापूर व ठाणे या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक फूलशेती घेतली जाते. याशिवाय नाशिक, औरंगाबाद, सांगली, सातारा, नागपूर, नांदेड या भागातही फूलशेतीला प्राधान्य दिले जाते. राज्यातील फूलशेतीचे मुख्य केंद्र पुणे जिल्हा आहे. राज्यात साधारणत: सहा हजार हेक्टरवर पॉलिहाऊस, तीन हजार एकरवर शेडनेट, तर नऊ हजार हेक्टर खुल्या जमिनीवर फूलशेती होते. 

झेंडूची लागवड महिनाभर उशिरा 

झेंडूची लागवड साधारणत: जुलै महिन्यात केली जाते. यंदा अधिकमास असल्याने नवरात्र व दिवाळी एक महिना उशिरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड ऑगस्टमध्ये केली. नाशिक जिल्ह्यात पितांबरी व अष्टगंधा या झेंडूच्या जातीला प्राधान्य दिले जाते. नवरात्रीपासून येणारी फुले दिवाळीत संपतात. 

आम्ही वर्षानुवर्षे फूलशेती करत आहोत. नवरात्र व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक एकरात लागवड केली आहे. गेल्या वर्षी २५ ते ३० रुपये किलो भाव होता. यंदा ४० ते ५० रुपये किलो भाव मिळण्याची अपेक्षा आहे. धार्मिक स्थळे सुरू झाल्यास फुलांना मागणी वाढेल. - बाबाजी गांगुर्डे, शेतकरी, सोग्रस (ता. चांदवड) 

सण-उत्सवात ग्राहकांकडून फुलांची मोठी मागणी असते. त्यामुळे झेंडूसह इतर फुलांमधून चांगले उत्पन्न मिळू शकेल. योग्य नियोजन केल्यास फूलशेती फायदेशीर ठरू शकते. नाशिक जिल्ह्यात चांदवड, कळवण, दिंडोरी व मालेगाव तालुक्यांत फूलशेती होते. - गोकुळ आहिरे, तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव

संपादन - किशोरी वाघ


  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT