Officials of the Food and Drug Administration along with the seized stock of chilli, coriander powder. esakal
नाशिक

Nashik Crime: अन्न-औषध प्रशासनाची शीतगृहावर धाड; लाखोंची मिरची, धने पावडर जप्त

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील नारंग कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून लाखोंचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त संजय नारगुडे यांनी दिली. (Food and Drug Administration raids cold storage Lakhs worth of chili coriander powder seized Nashik Crime)

अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

प्रशासनाद्वारे नारंग कोल्ड स्टोअरेज या ठिकाणी धाड टाकून तपासणी केली असता, कुठलेही लेबल नसलेल्या, मार्च २०२३ पासून साठविलेल्या मिरची पावडर १०, १०८ किलो व धने पावडर ४,२७८ किलोचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला.

सदर साठा हा मे. जे. सी. शहा अॅन्ड कंपनी, द्वारका, या पेढीचा आहे. सदर प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठविण्यात येत असून अहवाल आल्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही घेण्यात येईल.

सदर कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी सहआयुक्त संजय नारगुडे तसेच सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड, मनीष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

भेसळयुक्त अन्नपदार्थांसंदर्भात तक्रार तसेच काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरित टोल फ्रि क्रमांकावर (१८००२२२३६५) संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मुरली + भज्जी + वॉर्न + कुंबळे! पठ्ठ्याची गोलंदाजी पाहून क्रिकेटविश्व स्तब्ध; इंग्लंडच्या माजी कर्णधाराने दिली ऑफर

Nagar Panchayat-Nagar Parishad elections जाहीर… परंतु इच्छुकांना इशारा! ‘हे’ केल्यास थेट जेलची वारी! काय म्हणतो कायदा?

Bishnoi Gang: धक्कादायक! हल्लेखोर आले अन् धाड... धाड... धाड... प्रसिद्ध कबड्डीपटूला बिश्नोई टोळीनं संपवलं, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकीय पक्षाकडून तयारीला सुरुवात

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ३७ धावांत ६ विकेट्स; वेस्ट इंडिजने सॉलिड मॅच फिरवली, ७ धावांनी बाजी मारली

SCROLL FOR NEXT