A delegation from Italy visiting Pramod Aher's watermelon and onion farm here. esakal
नाशिक

Nashik Agriculture News : देवळा येथील शेती कामकाजाची इटलीतील परदेशी पाहुण्यांना भुरळ!

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा (जि. नाशिक) : इटली देशातील शिष्टमंडळाच्या सदस्यांनी देवळा येथील प्रमोद मनोहर आहेर यांच्या कांदा, टरबूज, मका शेतीला भेट दिली.

या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीतील प्रयोग व पिकांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी कांदा पिकांसह विविध फळबागा पाहून त्यांना उत्कृष्ट कामाची भुरळ पडली. (Foreign visitors from Italy are fascinated by agricultural work at Deola Nashik Agriculture News)

गुणवत्तापूर्ण शेतीमाल उत्पादन घेणाऱ्या देशांकडे शेतीमाल आयातदार देशांची विशेष लक्ष असते. याच पार्श्वभूमीवर इटली येथील शिष्टमंडळाने देवळा येथील प्रमोद आहेर यांच्या शेताला भेट देत शेतातील कांदा पिकातील उत्कृष्ट शेती कामकाज, हाताळणी व साठवणूक व्यवस्थापन कांदा चाळ पाहणी दौरा केला.

भारतीय कांद्याची चव, आकार यात वेगळेपण असल्याने शिष्टमंडळाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट क्षेत्रावर जाऊन कांदा लागवड व्यवस्थापन, लागवड पद्धत, सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून उत्पादकता वाढ यासंबंधी कामकाज अनुभवले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

तसेच मका व्यवस्थापण, खत व्यवस्था आणि सोयाबिन यांच्या उत्पादन वाढीसाठी तसेच नविन तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण केली.

या भेटीत इटली येथील शिष्टमंडळाने शेती कामकाजाची पाहणी केल्यानंतर त्यांचे आदरातिथ्य आहेर कुटुंबीयांनी केले.

यावेळी सत्कार करत अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी त्यांना दिली. यावेळी राजीव पगार, प्रमोद आहेर, सम्राट वाघ, तुषार आहेर, शरद आहेर, विनोद आहेर, उत्तम आहेर, पंकज सावकार, शरद खैरनार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT