kalsubai harischandra gad  esakal
नाशिक

अभयारण्यातील फिरणे होणार अधिक सोपे; कळसूबाई- हरिश्चंद्रगडसाठी ‘App’ची निर्मिती

कुणाल संत

नाशिक : कळसूबाई- हरिश्चंद्रगड या अभयारण्यात पर्यटक यांना फिरणे हे अधिक सोपे होणार आहे. यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने नाशिक वन्यजीव विभागातर्फे स्वतंत्र ‘ॲप’ ची निर्मिती केली जाणार आहे.

त्यादृष्टीने विभागाकडून आवश्‍यक ती कार्यवाही केली जात आहे. ॲपच्या मदतीने पर्यटक यांना अभयारण्याची सखोल माहिती, पर्यटनस्थळी जाण्याचे विविध मार्ग, गड, किल्ले, प्रतिबंधित स्थळे आदींची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे अभयारण्यातील फिरणे हे अधिक सोपे होणार आहे. (forest department Creation of App for Kalsubai Harishchandragad tourism nashik Latest Marathi news)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक वन्यजीव विभागातर्फे अनेक चांगले उपक्रम राबविण्याचा निर्णय विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी घेतला आहे. त्याचाच एक भाग कळसूबाई- हरिश्चंद्रगड या अभयारण्यात पर्यटक यांना फिरणे हे सोपे व्हावे म्हणून ‘ॲप’ तयार केले जाणार आहे.

या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी येणारे सर्व मार्ग, त्यातील अवघड, कमी अवघड आणि सोपा मार्ग कोणता हे रंगाच्या माध्यमातून दर्शविले जाईल. तसेच या ठिकाणी असलेले गड, किल्ले, धबधबे, कोकणकडा, येथील प्रेक्षणीय स्थळे आदींची संपूर्ण माहिती, तिथे जाण्याचे सर्व मार्ग, तिथे थांबण्यासाठी असलेली जागा, तिथले धोकादायक ठिकाणे, हॉटेल्स, वेळप्रसंगी विभागाशी संपर्क साधण्यासाठीचे क्रमांक, अपघातांची ठिकाणे आदींचा माहिती समाविष्ट असेल. यामुळे अभयारण्यात फिरण्यासाठी येणारे पर्यटक, गिर्यारोहक यांचे फिरणे व गिर्यारोहण हे अधिक सुलभ व सुरक्षित होणार आहे.

"पर्यटक व त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन्यजीव विभागाकडून सखोल माहिती असणारे ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही देखील सुरु झाली आहे. जंगलात किंवा रेंज नसलेल्या ठिकाणी ॲप कसे काम करेल याचाही विचार केला जात आहे. ॲपमुळे नक्कीच सर्वांना याचा फायदा होईल." - गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आषाढी वारीत यंदा पहिल्यांदाच ‘बीबीपीपीडीआर’ प्रणाली! जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची माहिती; ५५० मोबाईल अन्‌ यंत्रणेसाठी तीन कोटींचा खर्च, वाचा...

IND vs ENG Test: पहिल्या दिवशी लॉर्ड्सवर अटीतटीचा थरार; मानधना, हरमनप्रीत अन् दीप्तीची अर्धशतकं, इंग्लंड २६४ धावांनी पिछाडीवर

सोलापूर शहर पोलिसांची कामगिरी! हमालाच्या पत्नीचे सौभाग्याचे लेणं चोरणारे दोघे जेरबंद; ६ महिन्यांपूर्वी गड्डा यात्रेत महिलेचे दागिने चोरी, पोलिसांनी तो चोरटा पकडलाच, वाचा...

Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2026

SCROLL FOR NEXT