godavari river file photo esakal
नाशिक

Nashik News: नाशिककरांची जीवनदायिनी गोदावरीची अवहेलना सुरूच! नाल्यांच्या पाण्यामुळे गटाराचे स्वरूप

दत्ता जाधव

नाशिक : सलग दुसऱ्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरण समुहात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु याही स्थितीत सध्या गोदावरीची अवस्था एखाद्या गटार गंगेसारखी झाली आहे. दुसरीकडे वाघाडी, लेंडी नाल्यांचे पाणी थेट गोदापात्रात मिसळत आहे.

उच्च न्यायालयाने आदेशित करूनही घाटावर बिनदिक्कत कपडे धुतले जात असून, नुकत्याच करण्यात आलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांवरच वाळत घातले जात आहेत. (Form of drain due to drain water mixing in godavari river Nashik News)

नाशिकची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीची अवहेलना सर्वच बाजूने सुरू आहे. सध्या ख्रिसमसच्या सुट्या असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने शहरात आले आहेत. मात्र, रामतीर्थातील दुषित पाण्यामुळे अनेक भाविक स्नानाला धजावत नाहीत.

त्यातच रामतीर्थातील पाणी तीर्थ म्हणून नेण्याचे भाग्य मिळवून देणाऱ्या गोमुखातील पाणीपुरवठा बंद असल्याने भाविकांना रामतीर्थातील पाणीच तीर्थ म्हणून न्यावे लागत आहे. इतर कुंडांतही मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा साचला आहे. नदी प्रवाहित नसल्याने हा कचरा वर तरंगत असून, त्यामुळे नदीला बकाल स्वरूप आले आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

देवांग जानी यांचा एकांगी लढा

गोदाप्रेमी सेवा समितीचे देवांग जानी यांनी य. म. पटांगणावरील पुरातन पायऱ्या नाहक तोडण्यासह देवीचा सांडवा, तोडण्यात आलेल्या मंदिराच्या दुरवस्थेबद्दल हिंदुत्ववादी संघटनांच्या साथीने पदरमोड करत आंदोलन छेडले. या कामांच्या विरोधात व्यापक लढाही उभारला.

परंतु, शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावरही नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत नसल्याचा प्रत्यय श्री. जानी यांना आला. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसह झालेल्या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात जानी यांच्यासह रामसिंग बावरी, बाबासाहेब (मामा) राजवाडे, नंदू मुठे, पंडित नरेंद्र धारणे, उमापती ओझा, नवनाथ जाधव, पप्पू चौधरी, कैलास देशमुख यांच्यासह मोजके नाशिककर उपस्थित होते.

कुंडांची अवस्था डबक्यांसारखी

कधीकाळी प्रत्येक कुंडात नदी प्रवाहित नसली तरी नैसर्गिक जलस्त्रोतामुळे नितळ पाणी असे. आता रामतिर्थापासून तपोवनपर्यंत नदीच्या पाण्याला उग्र दर्प येतो. तपोवन परिसरात तर स्प्रिंक्लरद्वारे नदीपात्रात फवारणी करून फेस कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच सांडवे काढून टाकल्यावर तुटलेला भाग तसाच पडून असल्याने गोदेच्या सौंदर्यासही बाधा पोहचत आहे.

रामतीर्थातील पाणी बांध घालून अडविण्यात आल्याने साचलेल्या या पाण्यात महिला भाविकांनी सोडलेले दिवे व त्यातील निर्माल्याच अधिक दिसते. विशेष म्हणजे गोदावरीची अशी अवस्था असताना केवळ आरतीसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT