Former District Chief of MNS Sudam Kombde will re enter MNS nashik news
Former District Chief of MNS Sudam Kombde will re enter MNS nashik news esakal
नाशिक

Nashik MNS News : एकेकाळी मनसेची ताकद वाढविणारा `हा` नेता पुन्हा स्वगृही परतणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पाथर्डी परिसरात मोठी ताकद असलेले मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष , माजी नगरसेवक आणि सध्या भाजपमध्ये कार्यरत असणारे सुदाम कोंबडे हे मंगळवार (ता २) घरवापसी करीत आहे. (Former District Chief of MNS Sudam Kombde will re enter MNS nashik news)

मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मनसे मध्ये प्रवेश करणार आहे. माजी आमदार वसंत गीते यांचे ते शिष्य मानले जातात. त्यामुळे गीते यांनी मनसे त प्रवेश केल्यानंतर त्याच दिवशी कोंबडे देखील तेंव्हा मनसे त गेले होते.

त्यावेळी 2012 च्या पंचवार्षिक निवडणुकीत सध्या शिंदे गटात असलेल्या शिवसेनेचे सुदाम डेमसे यांचा पराभव करून ते निवडून आले होते. मनसेचे ऍड यतीन वाघ महापौर झाले.त्यांच्या टर्म नंतर कोंबडे यांनी महापौर पदाची फील्डिंग लावली होती. ते त्याच्या अगदी जवळ देखील पोचले होते. मात्र अशोक मुर्तडक महापौर झाले. तेव्हापासूनच गीतें सोबत त्यांचे संबंध काहीसे दुरावल्याचे जाणकार सांगतात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

असे असले तरी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघत असताना शहरात आणि विशेषतः ग्रामीण भागात आपल्या कामाचा ठसा उमटवला होता .मात्र त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत इतरांसोबत त्यांनी देखील मनसे ला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश करून उमेदवारी केली.

मात्र डेमसे यांच्याकडून ते पराभूत झाले. अर्थात ते भाजपशी कधीच एकजीव होऊ शकले नाहीत. सध्या मात्र शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट तसेच भाजपमध्ये देखील आगामी महापालिका निवडणूकी च्या पार्श्वभूमीवर पाथर्डी भागात मोठी पक्षांतर्गत स्पर्धा आहे.

त्यामुळे त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. असे असले तरी कोंबडे यांच्या कामाची पद्धत बघता आगामी काळात मनसे देखील या भागात पूर्वीच्या फॉर्मात येईल हे नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT