नाशिक

Nashik MD Drug Case : एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये माजी महापौरांचा जबाब; अमलीपदार्थ विभागाकडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : मुंबई पोलिसांनी नाशिक शहरात एमडी ड्रग्ज या अमलीपदार्थाच्या कारखानदारीचे उद्योग समोर आणल्यापासून सतर्क झालेल्या शहर पोलिसांनी नाशिक रोडचे एमडी वितरणाच्या रॅकेटचे पाळेमुळे खोदायला सुरवात केली आहे.

आज याच प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी माजी महापौर विनायक पांडे यांचा जबाब नोंदविला. (Former mayor statement in MD drugs case nashik crime news)

एमडी ड्रग्ज अमलीपदार्थाच्या वितरणात त्यांच्या वाहनाचा चालक चौकशीच्या फेऱ्यात असून, त्याच अनुषंगाने ही चौकशी झाली. संशयित हा पांडे यांच्या वाहनाचा सुमारे बारा वर्षे चालक होता. मात्र पावणेदोन वर्षापासून तो चालक नसल्याने त्याच्या कृत्याविषयी पोलिसांनी माहिती घेतल्याचे समजते.

यासंदर्भात श्री. पांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘आज दुपारी दोनला पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. त्यानुसार दुपारी गेलो. संशयिताच्या कामकाजाची माहिती दिली. संबंधित आपल्याकडे बारा वर्षे चालक होता

सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी सहा ते दहा, या वेळेत चालक म्हणून कार्यरत असायचा. यात दुपारी मधल्या वेळेत त्याच्या कृत्याविषयी मलाही माहिती नाही. या प्रकरणात पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

अंधारेंसोबतच्या त्या फोटोची चर्चा

एमडी ड्रग्ज प्रकरणानंतर सुरु झालेला राजकारण, आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा कधी आमने-सामने तर कधी सोशल मिडीयाच्या माध्यमातून उडतं आहे. शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने अर्जुन परदेशी याला दीड वर्षांपूर्वीचं काढून टाकल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांच्या सोबत अर्जुनचे फोटो कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT