Sleeping News
Sleeping News esakal
नाशिक

Sakal Exclusive : घोरणाऱ्या 40 टक्‍के व्‍यक्‍तींना Sleep apneaचा धोका.!

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : झोपेत घोरणाऱ्या व्‍यक्‍तीची बहुतांश वेळा मस्‍करी केली जाते. परंतु घोरणे किंवा झोपेत अचानक घाबरून उठण्याच्‍या या समस्‍येचे रूपांतर स्लीप ॲप्‍निया या गंभीर आजारात होत असल्‍याचे निरीक्षण तज्‍ज्ञांनी नोंदविलेले आहे.

घोरण्याची सवय असलेल्‍या चाळीस टक्‍के व्‍यक्‍तींना स्लीप ॲप्‍नियाचा धोका असल्‍याचे सांगितले जाते आहे.

याशिवाय जीवनशैलीतील चुकीच्‍या सवयी, लठ्ठपणा, वाढत्‍या स्‍क्रीन टाइममुळे झोपेवर होणारे परिणाम आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. (Forty percent of people snore risk of sleep apnea Obesity along lifestyle changes lead to increased screen time Nashik News)

रात्रीच्‍या झोपेत अडथळे निर्माण होण्यासह सलग झोप न लागणे, झोपलेले असताना श्‍वास घेताना अडचण उद्‍भवणे, झोपेत सारखे कुस बदलावी लागणे, झोपेत असताना अचानक घाबरून उठणे अशी स्लीप ॲप्‍नियाची लक्षणे आहे.

झोपेदरम्‍यान हे त्रास होत असल्‍याने बहुतांश वेळा रुग्‍णांना याविषयी फारशी कल्‍पनाच नसते. परंतु त्‍यांच्‍यासोबत असलेल्‍या नातेवाइकांना मात्र याबाबत माहिती असल्‍याने त्‍यांनी सजग राहताना वेळीच तज्‍ज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली सल्‍ला घेण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त केली जाते आहे.

अनेक गंभीर आजारांचा धोका

स्लीप ॲप्‍नियाचा त्रास असलेल्‍या व्‍यक्‍तींना अनेक गंभीर आजार उद्‌भवू शकतात. मुळात मेंदूला ऑक्‍सिजनचा पुरवठा होत नसल्‍याने अर्धांगवायूचा झटका येणे, हृदयाशी निगडित समस्‍या, उच्च रक्‍तदाब, मधुमेह आदी आजार होण्याची भीती असते.

याकडे दुर्लक्ष ठरेल घातक..

लठ्ठपणामुळेदेखील स्लीप ॲप्‍नियाचा धोका वाढता आहे. त्‍यामुळे उंचीच्‍या प्रमाणात वजन असले पाहिजे. जेवण व झोपण्याच्‍या वेळा निश्‍चित असल्या पाहिजे. झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी टीव्‍ही, मोबाईल व अन्‍य गॅझेटशी संपर्क टाळलेला योग्‍य ठरेल. तसेच जेवणानंतर लगेचच न झोपता किमान एक तासाचे अंतर राखले पाहिजे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

टॉन्‍सिल, नाकाचे वाढलेले हाड असल्‍यास सावधगिरी हवी

लहान मुलांमध्येही स्लीप ॲप्‍निया आढळून येत असून, याचे प्रमुख कारण म्‍हणजे टॉन्‍सिल, नाकाच्‍या वाढलेल्‍या हाडामुळे श्‍वसनास अडथळा निर्माण होतो. परंतु उपचार, शस्‍त्रक्रियेनंतर अशा बालकांची वाढ झपाट्याने होताना, अभ्यासात समाधानकारक प्रगती साधली जात असल्‍याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविलेले आहे.

"स्लीप ॲप्‍निया या आजाराबद्दल आजही समाजात पाहिजे तशी जागृकता नाही. घोरण्याची सवय असलेल्‍यांना आजाराचा धोका अधिक असतो. याशिवाय लठ्ठपणा हेदेखील महत्त्वाचे कारण असून, आपला ‘बीएमआय’ व्‍यवस्‍थित ठेवला पाहिजे.

ठाणे येथे डॉ.अभिजित देशपांडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ स्लीप सायन्‍स येथे सखोल संशोधन होत असून, स्लीप ॲप्‍नियाविषयी भारतातदेखील जागृकता निर्माण होते आहे. आणखी व्‍यापक प्रयत्‍न होण्याची आवश्‍यकता आहे."

- डॉ. मुरारजी घाडगे, ई ॲन्ड टी सर्जन, रूबी हॉल क्‍लिनिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT