rishikesh 1.jpg 
नाशिक

वडिलांची म्हातारपणाची काठी असलेल्या 'ऋषिकेश'ची अचानक एक्झिट; परिसरात हळहळ

वाल्मिक शिरसाट

पांढुर्ली (जि.नाशिक) : ऋषिकेश आपल्या वडिलांसोबत आगासखिंड शिवारातील दारणा नदीच्या काठावर कामानिमित्त गेला होता. पण तेव्हा वडिलांनाही नव्हते माहित कि आपल्याच डोळ्यादेखत म्हातारपणाची काठी बनलेल्या लेकाला भडाग्नी द्यावा लागेल. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

२३ वर्षांच्या 'ऋषिकेश'ची अचानक एक्झिट

आगासखिंड(ता.सिन्नर) शिवारातील दारणा नदीच्या काठावर शेतीसाठी पाणी नेण्यासाठी वडिलांसोबत विद्युत जलपरी बसवत असतांनाच ऋषिकेश एकनाथ वीर (वय 23) याचा पाय घसरला व दारणा नदीच्या पात्रात पडला. ही घटना रविवारी (ता.7) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक शेतकरी व पोहणारे यांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र यश आले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध घेतला असता दुपारी साडेचारच्या सुमारास घटनास्थळापासून जवळच त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलीस हवालदार रामनाम जाधव यांनी तो पाण्यतुन बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून चिकित्सा करण्यासाठी सिन्नरच्या पालिका रुग्णालयात नेला.

पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद

या तरुणाचा मृतदेह घटनेच्या दुसऱ्या दिवशी नदीपात्रात पाण्यावर तरंगतात आढळून आला. सिन्नर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चिकित्सेनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. चिकीत्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.आगासखिंड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. हवालदार रामनाम जाधव अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT