old mill.jpeg 
नाशिक

मिलच्या भिंतीच्या आडोशाला 'त्यांना' चोरीछुपे लपवलं...गुप्त माहिती मिळताच झाला खुलासा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : दगडू ऑइल मिलच्या भिंतीच्या आडोशाला 'त्यांना' लपवलं होतं. आणि याची कुणकुण पोलीसांना लागली. त्यानंतर पोलीसांनी मिल परिसरात अचानक धाड टाकली आणि झाला खुलासा...

असा घडला प्रकार

शहरातील नागछाप झोपडपट्टी भागातील दगडू ऑइल मिलच्या भिंतीच्या आडोशाला त्यांना' लपवलं होतं. आणि याची कुणकुण पोलीसांना लागली. त्यानंतर पोलीसांनी मिल परिसरात अचानक धाड टाकली आणि धक्कादायक खुलासा झाला. बुधवारी (ता.१५) सकाळी सव्वासातच्या सुमारास उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी छापा टाकून गोवंश हत्याबंदी असताना कत्तलीसाठी आणण्यात आलेली ५४ हजार रुपये किमतीची चार जनावरे जप्त केली. फजलू (पूर्ण नाव समजू शकले नाही) याने कत्तलीसाठी ही जनावरे आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फजलू फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

गुन्हा दाखल

अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवले यांच्या आदेशान्वये पोलिस नाईक साजिद शेख, इम्रान सय्यद, सचिन थोरात, काळू माळी, सचिन बेदाडे आदींनी ही कारवाई केली. फजलूविरुद्ध माळी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गोवंश हत्या सुधारणा कायदा व प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; प्रशासनाचे दुर्लक्ष!

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

SCROLL FOR NEXT