corona covid19.jpg 
नाशिक

BREAKING : मालेगावात एकाच दिवसात १४ कोरोना पॉझिटिव्ह.. शहरातील वाढता मृत्यूदर चिंताजनक!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉट मालेगावमध्ये बाधितांचे शतक झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी ९ व सकाळी ५ जणांचे असे एकूण १४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातून कोविड-१९ चा संसर्ग झालेल्या व्यक्तीची संख्या ११० झाली. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर व मालेगाव कोरोनाचे हाँटस्पाँट झाले आहे. मालेगावी कोरोनाबाधित रूग्णांनी शंभरी गाठली आहे. दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

संध्याकाळी आणखी ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

मालेगावकरांच्या दृष्टीने बुधवार तसा काहीसा दिलासादायक होता.. तर एका बाधितासह चौघांचा मृत्यू झाला होता. परंतु, गुरुवारी सकाळी ४७ वर्षीय दोन, ३७, ७० व ४४ वर्षीय अशा पाच संशयितांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. हे पाचही हाय रिस्क संपर्कातील व वेळीच क्वारंटाइन केलेले होते. तर संध्याकाळी आणखी ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे मृतांची आकडेवारी ही दशकस्थानी पोहोचली आहे. शहरात ८ एप्रिलला पहिले पाच रुग्ण आढळले होते. हा आलेख शंभरीपर्यंत उंचावण्यास फक्त १५ दिवस लागले. यावरून शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव किती झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT