fake baba.jpg 
नाशिक

फेसबूकची जाहीरात पाहून अडकला अंधश्रद्धेच्या जाळ्यात; भोंदूबाबाने लावला चुना

युनूस शेख

नाशिक : भोंदूबाबाची फेसबुकवर जाहिरात पाहिली. कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी पूजाविधी केला जात असल्याची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली. आणि तिच जाहीरात पाहून युवकालाही वाटले कि आता आपल्या जीवनातील कष्ट कायमचे संपतील, या आशेने तो चांगलाच फसला...

काय घडले नेमके?

पीडित युवक सचिन परमार याने संशयित भोंदूबाबाची फेसबुकवर जाहिरात पाहिली. कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी पूजाविधी केला जात असल्याची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली. संपर्कासाठी कानपूर, आर्यनगर येथील आचार्य सतीश अवस्थी असे नाव व त्यापुढे मोबाईल क्रमांक दिला होता. युवकाने त्यांच्याशी संपर्क साधला. सर्व अडचण दूर करण्यासाठी विशेष पूजाविधी करावा लागेल, असे सांगत त्याने खात्यामध्ये काही रक्कम टाकण्यास सांगितली. ९ नोव्हेंबर २०१९ ते १० मार्च २०२० पर्यंत वेळोवेळी कधी एक हजार पाचशे, कधी तीन हजार, दहा हजार अशी एकूण ५० हजारांची रक्कम ऑनलाइन खात्यावर टाकली. इतके करूनही काहीएक फरक पडला नाही. युवकाने पूजाविधी केल्याचा व्हिडिओ किंवा ध्वनिफीत व्हॉट्सॲपवर टाकण्यास सांगितले.

५० हजारांचा फटका; भद्रकाली पोलिसांत तक्रार

त्यानंतर त्याने युवकाचा मोबाईल क्रमांक आणि व्हॉट्सॲप क्रमांक दोन्ही ब्लॉक करून टाकले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने भद्रकाली पोलिसांत तक्रार दिली. भोंदूबाबाच्या आमिषाला बळी पडत अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या युवकाला ५० हजारांचा फटका बसल्याचा प्रकार उघड झाला. युवकाने भोंदूबाबाविरुद्ध भद्रकाली पोलिसांत तक्रार दाखल केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT