Pilgrims giving a statement to Police Commissioner Ankush Shinde to take action against the suspects in the case of cheating Hajj pilgrims.
Pilgrims giving a statement to Police Commissioner Ankush Shinde to take action against the suspects in the case of cheating Hajj pilgrims. esakal
नाशिक

Nashik Crime: हज यात्रेच्या नावाखाली टूर्स चालकाकडून फसवणूक अन् जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हज यात्रेला जाण्यासाठी पैसे घेतल्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षे हज यात्रा रद्द करण्यात आली. परंतु त्यानंतर यात्रेला न पाठविता दिलेले पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे.

याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयितांतील एकाच्या भावाने जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी तक्रारदारांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. (Fraud death threats by tour operators in name of Hajj Statement to Commissioner of Police Nashik Crime news)

मे. असफाह हज्ज ॲन्ड उमराह सर्व्हिसेस नाशिक या संस्थेचे भागीदार नविद सादिकमिया जहागिरदार, सर्फराज इकबाल काझी, मोहम्मद जब्बार शेख, रफिक रब्बार शेख अशी संशयितांची नावे आहेत. फिरोज बशिर सय्यद (रा. झिनतनगर, राणाप्रताप चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, जुलै २०२२ मध्ये संशयितांनी सय्यद यांना हज यात्रेसाठी पॅकेज दिले होते.

त्यानुसार त्यांनी पैसे दिले होते. परंतु संशयितांनी त्यांना हज यात्रेसाठी पाठविले नाही. त्यामुळे सय्यद यांनी पैसे परत मागितले असता, संशयितांनी दिले नाहीत. तर संशयित रफिक शेख याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अब्दुल हमीद शकूर शेख, फरजाना अब्दुल हमीद शेख यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेत निवेदन दिले. या निवेदनानुसार, संशयित जहांगीरदार, काझी व मोहम्मद शेख यांनी २०१९ मध्ये हज यात्रेसाठी पॅकेज दिले. प्रत्येकी पावणेतीन लाख रुपये याप्रमाणे दोघांचे साडेपाच लाखांचे पॅकेज तक्रारदारांनी स्वीकारले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

त्याप्रमाणे, अडीच लाख रुपये आगाऊ दिले. दरम्यान, २०२० मध्ये कोरोनामुळे हज यात्रा रद्द झाली. तक्रारदारांनी विचारणा केली असता, २०२१ मध्ये हज यात्रा होणार असल्याचे सांगत उर्वरित तीन लाखांची रक्कमही मागे लागून घेतली. मात्र २०२१ मध्येही हज यात्रा कोरोनामुळे रद्द झाली. संशयितांनी पुन्हा २०२२ मध्ये हज यात्रा होणार असल्याचे आश्वासन दिले.

जून २०२२ मध्ये संशयितांनी त्यांना ३० जूनला हज यात्रेची फ्लाईट असून मुंबईत जायला सांगितले. त्यांना तिथेच विसा आणि तिकीट मिळेल असे सांगितले. मात्र संशयितांनी त्यांनी फसवणूक केली. त्यांना हजयात्रेला पाठविलेच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संशयितांकडे पैशांसाठी तगादा लावला.

संशयितांनी टाळाटाळ करीत अडीच लाखांचा धनादेश दिला. तो वटला परंतु उर्वरित तीन लाखांची मागणी केली असता संशयितांना भेटायला बोलावून संशयित रफिक जब्बार शेख याने गुंडाना आणून जीवे मारण्याची धमकी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

SCROLL FOR NEXT