Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तब्बल 94 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऑनलाइन पार्ट टाइम जॉबच्या बदल्यात टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने ३४ वर्षीय तरुणाला वेगवेगळ्या बँकेत ९४ लाख रुपये जमा करण्यास सांगून सायबर भामट्याने गंडा घातला.

याप्रकरणी शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud of Rs 94 Lakhs on lure of part time job Nashik Cyber ​​Crime)

हर्षल शिंपी (रा. वृंदावननगर, कामटवाडे शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, सायबर भामट्यांनी ऑनलाइन पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून टास्क दिले. टास्क पूर्ण केल्यानंतरही संशयितांनी मोबदला दिला नाही.

याबाबत पाठपुरावा केला असता, संशयितांनी त्यांना विविध मोबाईल क्रमांक, टेलिग्राम आयडींचा वापर करून विविध खात्यांवर पैसे भरण्यास सांगून ९४ लाख १३ हजार ४४१ रुपयांचा गंडा घातला.

याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल होऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT