Fight esakal
नाशिक

Nashik News: परधाडी शाळेत गुरूजींमध्ये फ्री स्टाइल!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील परधाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक व उपशिक्षक यांच्या फ्री स्टाइल हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांनीही परस्पर विरोधात तक्रारी दाखल केल्या.

शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या झालेल्या या हाणामारीची चांगलीच चर्चा गाव व तालुक्यात रंगली.

या घटनेची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेत याबाबत शिक्षण अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविला असून जिल्हा शिक्षण विभागाकडून काय कारवाई होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी (ता.१९) हा प्रकार घडला. (Free style in Pardhadi between School teachers Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी (ता.१९) सकाळच्या सत्रात नियमित शालेय कामकाजाच्या बैठक सुरु असताना मुख्याध्यापक शांताराम गवळी आणि उपशिक्षक नरेंद्र ढोले यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. घटनेची माहिती कळताच गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी या प्रकारची गंभीर दखल घेत प्रभारी शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले. या विवादाला स्थानिक व बाहेरगावचा अशी किनार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

यापूर्वी देखील परधाडी येथील शाळेच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी जिल्हा शिक्षण विभागापर्यंत पोचल्या आहे. विशेष म्हणजे या शाळेत सौरऊर्जेवरचा सीसीटीव्ही कॅमेरे असूनही हाणामारीचे फुटेज यावेळी नसल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT