Sunil Darade of Textbook Distribution Department and concerned officers and staff with the vehicle that dispatched books to the taluk from Nashik. esakal
नाशिक

Free Textbook Scheme : विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके; शालेय विभागाचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा

Free Textbook Scheme : राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत जिल्ह्यातील शाळांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तके सर्व तालुकास्तरावर पोचली असून शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देण्यात येईल असे नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील ४ हजार २३८ शाळांमध्ये ५ लाख २५ हजार ५६० विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तक पुरवली जाणार आहेत. (Free Textbook Scheme Students will get textbooks on first day School Division Planning nashik news)

राज्य शासनाने शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाचे ओझे कमी करण्याच्या उद्देश पूर्ण करण्यासाठी पुस्तकात वह्यांची पाने जोडली आहेत. यासाठी एकत्रित विषयानुरूप आशयांचे एकात्मिक पुस्तक निर्मिती केली आहे.

वह्यांची पाने जोडल्याने लेखन सरावासाठी व अभ्यासास पूरक ठरणार असून ग्रामीण भागातील गोरगरीब वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

केंद्रांतर्गत शाळांसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून पुस्तके नेण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. तर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांना केंद्रातून पुस्तके न्यावी लागतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विशेषतः केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांना पदरमोड करून पुस्तकांची वाहतूक करावी लागते. पुस्तक वाटप योजना ही शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देणारी जरी असली तरी शिक्षकांसाठी ती मोठी डोकेदुखी ठरत आहे.

पुस्तकांच्या वाहतुकीसाठी शिक्षण विभागाकडे स्वतंत्र तरतूद नसल्यामुळे हा खर्च शिक्षक, मुख्याध्यापकांनाच आपल्या खिशातून करावा लागतो. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते.

"पुस्तक तालुका स्तरावर पोच झाली आहेत. पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देण्यात येणार आहे. त्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद व उत्साह असतो." - भगवान फुलारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT