Rush of patients to take medicine at Gopal Mangal office on Tuesday. esakal
नाशिक

Nashik: ‘फिट्स’ च्या आजारावर केला जातो विनामूल्य उपचार; औषध घेण्यासाठी रूग्णांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अनेकांना भेडसावणाऱ्या फिटस् या आजारावर विड्याच्या पानातून औषध घेण्यासाठी लक्ष्मी पूजनाचे औचित्य साधून पंचवटीतील गोपाल मंगल कार्यालयात मंगळवारी (ता.२५) गर्दी उसळली होती. विशेष म्हणजे यावेळी राज्याच्या विविध भागातून तसेच राज्याबाहेरीलही रूग्ण उपस्थित होते. होळी पोर्णिमा, नागपंचमी तसेच दिवाळी अमावस्या अशा वर्षातून केवळ तीन वेळा हे औषध विनामूल्य देण्यात येते. (Free treatment for fits disease Crowd of patients to take medicine Nashik Latest Marathi News)

ब्रह्मलीन श्री रामलोचन स्वरूप ब्रह्मचारीजी महाराजांच्या आदेशाने, सामाजिक सेवा ह्या उद्देशाने दिले जाते. विविध वनस्पतींचा वापर करून तयार केलेले हे औषध सर्वांसाठी विनामूल्य दिले जाते. फिट्स म्हणजे चक्कर येऊन पडणे, मेंदूला झटके येणे, तसेच तोंडातून फेस येणे, दातखिळी बसणे ह्यालाच फिट्स किंवा हिंदीत मिरगी येणे असे म्हणतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

अश्विनी दिनेश वैद्य, दिनेश मोहन वैद्य यांनी रूग्णांना विड्याच्या पानातून औषध दिले. या प्रसंगी काळाराम मंदिराचे विश्वस्त मिलींद तारे, संजय लोळगे यांच्यासह पंचवटीतील सेवकांनी रुग्ण व्यवस्था सांभाळली.

ब्रह्मलीन श्री रामलोचन स्वरूप ब्रह्मचारीजी महाराजांच्या आदेशाने सासऱ्यांनी हा उपक्रम अनेक वर्षे चालविला. आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून हे कार्य विनामूल्य औषधाच्या स्वरूपातून देऊन समाजसेवा करत असल्याचे अश्विनी वैद्य यांनी केला आहे. यापुढील औषध सहा मार्चला होळी पोर्णिमेला सकाळी १० ते १२ या वेळेतच गोपाल मंगल कार्यालय (सरदार चौक) येथे देण्यात येईल. हे औषध कोणत्याही वयोगटातील रुग्ण घेऊ शकतात. वर्षातील तीन दिवस औषध घेतल्यास रुग्णांना किमान ५० टक्के फरक पडतो, असा दावा वैद्य यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT