Climbers of Nashik who have climbed Friendship Peak. esakales2
नाशिक

Nashik News: गिर्यारोहकांनी मैत्रीचा झेंडा फडकविला शिखरावर!

बालपणीच्‍या मित्रांकडून हिमाचल प्रदेशातील फ्रेंडशिप शिखर सर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : हिमाचल प्रदेशातील मनालीजवळ असलेले समुद्रासपाटीपासून सुमारे १७ हजार ४०० फूट उंचावरील फ्रेंडशिप शिखर नाशिकच्या गिर्यारोहक मित्रांच्‍या चमूने सर केले आहे. बालपणीच्‍या चौघा मित्रांनी ही मोहीम यशस्‍वी करताना मैत्रीचा झेंडा शिखरावर फडकविला आहे.

मोहिमेत मिलिंद लोहोकरे, संदीप चाकणे, मानस लोहोकरे आणि योगेश गायकवाड यांच्‍यासह आदींचा समावेश होता. हे बालपणीचे मित्र आपल्या आपल्या वयाला हरवून मैत्रीचा वेगळा अर्थ शोधण्यासाठी मोहिमेत सहभागी झाले होते. (Friendship Shikhar Sir in Himachal Pradesh from childhood friends nashik)

‘फ्रेंडशिप पिक’ शिखरासाठी २८ जूनला सोलंग गावातून चढाईला त्‍यांनी सुरवात केली. २ जुलैला टीममधील सगळ्यात तरुण गिर्यारोहक मानस लोहोकरे याने समिट केले. मिलिंद लोहोकरे यांनी समिटच्या अगदी अलीकडे म्हणजे १७ हजार १०० फुटांपर्यंत यशस्वी मजल मारली.

तर संदीप चाकणे आणि योगेश गायकवाड यांनी १४ हजार फुटांपर्यंतची चढाई पूर्ण केली. अनेक गिर्यारोहण मोहिमा एकत्र केलेले ५६ वर्षांचे मिलिंद लोहोकरे आणि ५३ वर्षांचे चाकणे हे २५ वर्षांचा मानस लोहोकरे याला त्यातले आव्हान देत खुणावत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, योग्यप्रकारे व्हिडिओ डॉक्युमेंटेशन व्हावे, अशा प्रकारच्या मोहिमांमधील थरार, तयारी आणि इतक्या उंचावरील निसर्गाचे रूप या गोष्टी सामान्यांपर्यंत पोचविण्याच्‍या उद्देशाने योगेश गायकवाड मोहिमेत सहभागी झाले होते.

अशी होती आव्‍हाने..

कमी ऑक्सिजन पातळी, प्रचंड थंडी, मर्यादित संसाधने अशा प्रतिकूल परिस्थितीत चमूने मैत्रीचा अर्थ शोधत शिखर सर केले. वडील-मुलगा, बालपणीचे मित्र आणि व्यवसायानिमित्त झालेल्या मित्रांनी स्वतःच्या क्षमतेला आव्हान देत फ्रेंडशिप शिखर सर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT