vegitables corona.jpg 
नाशिक

बापरे! इथे तर फळभाज्या व्यापारीच कोरोना पॉझिटिव्ह..नाशिक अन् मुंबईच्या बाजारात होते जाणे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / म्हसरूळ : पालेभाज्या व फळभाज्या खरेदी-विक्रीच्या निमित्ताने नाशिक व मुंबईच्या बाजारात ये-जा करणाऱ्या भाजीपाला व्यापारी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो राहत असलेला पेठरोड परिसरातील भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 28 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. 

मुंबई कनेक्शन पडले महागात

नाशिक शहरासह जिल्हा भरातून बाजार समितीत पालेभाज्या व फळभाज्या ची आवक होते असते. या ठिकाणी शेतकरी, आडतदार, व्यापारी, हमाल मापारी येत असतात. सध्या जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून,पेठ रोड वरील राम नगर उद्यान जवळ राहणारे व बाजार समितीत फळभाज्याचा व्यापार करतात आणि शेतमाल हा मुंबई पाठवीत होते. त्यांचे मुंबईत जाणे येणे होते. त्यांना मधुमेहाचा त्रास वाढू लागल्याने शासकीय रुग्णालयात तपासणी साठी गेले असता त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.

शुक्रवार (ता.22) रोजी त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, वैद्यकीय अधीक्षक विजय देवकर, अधिकारी व कर्मचारी यांनी परिसराची पाहणी करून कोरोना बाधित रुग्णाचे राहते घर व बाजूचे चार घरे प्रतिबंधित केले असून बाजार समितीत सोबत काम करणारे व सतत संपर्कात आलेले 28 जणांना वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT