Dada Bhuse news esakal
नाशिक

Nashik News : मालेगाव बाह्यमधील रस्तेकामांसाठी 75 कोटींची निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरापाठोपाठ तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी ७५ कोटी रुपयांच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी शहरातील रस्ते विकासासाठी नगरविकास विभागाने १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. ही कामे प्रगतिपथावर आहेत. या मंजूर कामांना लवकरच सुरवात होईल असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. (Fund of 75 crores approved for road works outside Malegaon Nashik News)

तालुक्यातील नागरिकांच्या मागणीनुसार मतदारसंघातील गावांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांमुळे रस्ते, प्रमुख रस्त्यांच्या चौफुली सुशोभीकरण करणे, अपघात प्रवण क्षेत्रांची सुधारणा करणे, रस्त्यांचा दर्जा सुधारणे आदी कामे करण्यात येणार आहे.

ही कामी मार्गी लागल्यानंतर नागरिकांना दळणवळणाची सुविधा सुखकर होणार आहे. अर्थसंकल्पात रस्ते कामांसाठी ७५ कोटींचा भरीव निधी व कामांना मंजुरी मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या निधीतून अजंग, वडनेर या अपघात प्रवण क्षेत्राची सुधारणा होणार आहे. तर सटाणा- मालेगाव रस्तावरील आघार खुर्द चौफुली, काष्टी चौफुली, सोयगाव चौफुली यांचे सुधारणा व सुशोभीकरण होणार आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

या रस्त्यांची कामे व दुरुस्ती :

दुंधे-पांढरुण ते लखमापूर, नांदगाव - डोंगरगाव, कुकाणे-करंजगव्हाण, मालेगाव - नामपुर, डोंगराळे ते नागझरी, दाभाडी ते काष्टी फाटा, कुसुंबा रोड ते वजीरखेडे, टिंगरी- राजमाने, कजवाडे ते तालुका हद्द, कजवाडे -चिंचवे ते गाळणे, वळवाडी गांव ते म्हसोबा बारी, दाभाडी- वडेल- टिपे-कंक्राळे, सी सेक्शन-पिंपळगाव-जळगाव-पिंपळगाव ते अजंग, सवंदगाव-सायने, द्याने-खडक- हाताणे, वायगाव ते तालुका हद्द, वडनेर-वायगाव, कोठरे खुर्द - वायगाव-तालुका हद्द, नांदगाव ते टाकळी, आघार बुद्रुक-लखमापुर, वळवाडे- वाघखोरे-गारेगाव राष्ट्रीय महामार्ग ते पाटणे, नांदगाव - चिंचावड, राजमाने- लखाणे, दाभाडी कारखाना-काष्टी, दाभाडी-आघार बुद्रूक, साजवहाळ-शेंदुर्णी, महामार्ग ते कंधाणे, सायने- दसाणे रस्ता, दाभाडी-ढवळेश्वर, टेहरे- शिवनेरी, महामार्ग-मुंगसे, टेहरे-पाटणे, वाके फाटा ते टाकळी, मुंगसे ते सोनज, मुंगसे ते टाकळी, मुंगसे- टाकळी-शिरसोंडी, शेंदुर्णी ते राज्य मार्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MiG-21 retirement: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देशाचे रक्षण केल्यानंतर आता ‘मिग-21’ निरोप घेणार

Ganesh Visarjan: ...पुढच्या वर्षी लवकर या! मुंबईत १२ वाजेपर्यंत ४०० हून अधिक श्रींचे विसर्जन

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत तरुणांईचा मोठा सहभाग

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Latest Maharashtra News Updates : न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT