Ganesh Visarjan news esakal
नाशिक

गणेश विसर्जन मिरवणुकीचा मुहूर्त ठरला; जाणुन घ्या

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत विसर्जनाच्या दिवशी सकाळी ११ वाजता मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मिरवणुकीला उशीर करणारे तसेच दोन मंडळामध्ये अंतर ठेवत अन्य मंडळांना अडचण निर्माण करणाऱ्या मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले. (Ganesh Visarjan muhurat of procession nashik Latest Marathi News)

आतापर्यंत २४ मंडळांनी मिरवणुकीसाठी नोंदणी केली आहे. अशा मंडळांना क्रमांक देण्यासाठी पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. ६) भद्रकाली पोलिस ठाण्यात बैठक झाली. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत अनेक मंडळांना शेवटपर्यंत विसर्जन मिरवणूक काढता येत नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली.

यंदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास विसर्जन मिरवणुक सुरवात करण्याचा निर्णय घेतला. शिवाय दोन मंडळांमध्ये जास्त अंतर न ठेवता वेळेत मिरवणूक संपवण्यासाठी नियोजन केल्याचे श्री तांबे यांनी सांगितले. यामुळे मिरवणुकीमध्ये मंडळांची संख्या वाढण्यासह शेवटच्या मंडळास विसर्जन करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मिरवणुकीत कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंडळांनी पोलिसांसह त्यांचे स्वयंसेवक नियुक्त करावे. पोलिस विभागाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, साजन सोनवणे, रियाज शेख, सुनील रोहकले, सीताराम कोल्हे यांच्यासह सुनील बागूल, विनायक पांडे, गणेश भोरे आदि उपस्थित होते.

२०१९ ची क्रमवारी

२०१९ मध्ये झालेल्या विसर्जन मिरवणुकीत मंडळांना दिलेली क्रमवारीची पुनरावृत्ती या वर्षी केली आहे. गेल्या वर्षी दिलेल्या क्रमांकाप्रमाणे त्याच मंडळांना पुन्हा तेच क्रमांक दिले आहे. यंदा सिडकोच्या मंडळांनीदेखील नोंदणी केली आहे. नाशिक रोडचे काही मंडळ नोंदणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

"मिरवणूक वेळेत सुरू करणे अनिवार्य आहे. दोन मंडळांमध्ये अंतर राहणार नाही याची काळजी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. उशीर करणाऱ्या मंडळावर कारवाई करण्यात येणार आहे." - अमोल तांबे पोलिस उपायुक्त

"गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरवात होण्याची आत्तापर्यंतची पहिलीच वेळ आहे. वेळेत सर्वांना मिरवणुकीचा आनंद घेत शेवटच्या मंडळाला देखील विसर्जनाची संधी मिळावी.मिरवणूक वेळेत काढण्याचा प्रयत्न केला जाईल." - समीर शेटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT