Makhar for Decoration esakal
नाशिक

गणेशोत्सवानिमित्त विविध प्रकारची मखर बाजारात विक्रीला

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : गणेशोत्सव जवळ आल्याने बाजारात उत्सवाच्या खरेदीची तयारीला वेग आला आहे. गणेशोत्सवासाठी नवनवीन प्रकारची मखरे बाजारात दाखल झाली आहेत. पूर्वी थर्माकोलच्या मखराला मोठी मागणी होती; मात्र आता आर्टीफिशिल फुलं, वेली, फुलांच्या माळांपासून तयार करण्यात येणारे रेडिमेड मखरांची बाजारात चलती आहे.

गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा झालेला गणेशोत्सव यंदा मात्र धूमधडाक्यात साजरा होणार असल्याने खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहेत. (Ganeshotsav 2022 various types of Makhar are on sale in market Nashik Latest Marathi News)

यात बाप्पा विराजमान होणारे मखरांचे विविध पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत. पूर्वी फक्त थर्माकोलचे डेकोरेशन घरोघरी पहायला मिळत होते. आता मात्र फुलांचे, विविध माळा, तोरण बांबूचे डेकोरेशन असलेले विविध प्रकारचे पर्याय बाजारात पाहायला मिळत आहेत.

पडद्यापासून साकारलेले मखर

घरच्या घरी डेकोरेशनमध्ये पडद्याचे डेकोरेशन अनेकदा सजावटीसाठीचे पेपर क्राफ्ट स्वस्त आणि सुंदर सजावटीसाठी कागदापासून तयार करण्यात येणारे क्राफ्ट डेकोरेशन हा पर्यायदेखील बाजारात आहे. यात निरनिराळ्या प्रकारचे रंग वापरून विविध प्रकार साकारले जातात. यात पुट्ट्याचादेखील वापर केला जातो.

बॅकग्राउंड डेकोरेशन

हल्ली बाजारात बॅकग्राऊंड सजावटीचा नवीन प्रकार बघायला मिळत आहे. यात लाकडाच्या लहान लहान फांद्या वापरून झिकझॅक आकारातून मखर तयार केले जातात. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी वापरले जाणारे थर्माकॉलचेदेखील यात वापर करता येतो. यासाठी विविध रंगाचे पडदे आणून साकारलेले डेकोरेशन बाजारात उपलब्ध आहेत.

या मखरांची ८०० पासून ते २०००पर्यंत किंमत असून कमी वेळेत आकर्षक अशा सजावटीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सजावटीसाठी फुलांचा पर्याय गणपतीच्या फुलांची सजावटीसाठी लिली, ऑर्किड, क्रायसँथेमम्स, गुलाब आणि झेंडू यांसारख्या विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला जात आहे. मंदिराचे हे डेकोरेशन बाजारात २००० पासून उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT