crime3.jpg
crime3.jpg 
नाशिक

BREAKING : नाशिकमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार; सहाजण ताब्यात

सकाळवृत्तसेवा

नाशिक रोड : सामनगाव रोडवरील अरिंगळे मळ्यात एका अल्पवयीन मुलीवर एका संशयित महिलेलच्या अपप्रेरणेने एक विधीसंघर्षित बालक व पाच संशयितांनी मिळून सामुहिकरित्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 10) समोर आल्याने नाशिककर हादरले आहेत.  याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात एकुण सात संशयित आरोपींविरुध्द बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशी आहे घटना

रविवार (ता. 10) सामनगाव रोडवरील अरिंगळे मळा येथे धक्कादायक घटना घडली. दिपक समाधान खरात (वय १९), रवि शंकर कु-हाडे (वय १९), सुनिल लिंबाजी कोळे (वय २४), आकाश राजेंद्र गायकवाड (वय २४), सोमनाथ विजय घरात (वय १९), पुजा सुनिल वाघ (वय १९) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित पुजा वाघ हिने पीडिताला स्वत:च्या घरी बोलावून घेतले. पीडितेला जरा सुद्धा भनक नव्हती की यामागे काहीतरी षड्यंत्र असेल. पीडिता पुजा हिच्या घरी जाताच संशयित सहा युवक तिथे आले. त्या नराधमांनी आळोपाळीने पीडितेवर अत्याचार केले. पीडिता घडलेल्या प्रकाराने घाबरली होती. पीडितेचे आई-वडील मजुरी करत असल्याने ते कामावर गेले होते. पीडिता भेदरलेल्या स्थितीत गच्चीवर एका कोपऱ्यात जावून बसली. आई घरी येताच मुलीला अशा अवस्थेत बघून घाबरली. आईने विचारले असता पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. आईने थेट पोलिस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

सात संशयित आरोपींविरुध्द बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल

यानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलासह महिला व अन्य पाच युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना रविवारी (ता.10) सकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन या घटनेचा सखोल तपास सुरु असल्याचे खरात यांनी सांगितले.

अरिंगळे मळा बनतो आहे गुन्हेगारांचे केंद्र

नाशिक रोड येथील अरिंगळे मळा अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे केंद्र म्हणून ओळखला जातो आहे. गावठी कट्टे सापडणे, कोयते तलवारी, संघटित गुन्हेगारी करणे अशा गोष्टी अरिंगळे मळ्यात राहणारे गुन्हेगार करीत आहे. विशेष म्हणजे गावठी कट्टे विक्रीमध्ये अरिंगळे मळा हा शहरातील नंबर वन म्हणून ओळखला जातोय. बाहेरच्या शहरातील कुख्यात गुन्हेगार अरिंगळे मळ्यात काहीवेळा वास्तव्य करीत असल्याची चर्चा ही परिसरात असल्यामुळे या ठिकाणचे भाड्याने राहणारे भाडेकरू व इतर काही रहिवाशांची सखोल चौकशी करायला हवी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT