Gharkul Scheme esakal
नाशिक

Gharkul Scheme : शिवाजीवाडीमधील 13 लाभार्थ्यांचे घरकुल रद्द!

विक्रांत मते

नाशिक : पूर्व विभागातील शिवाजीवाडीमध्ये महापालिकेने बांधलेल्या घरकुल योजनेतील १३ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा न भरल्याने त्यांची घरकुले रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने महापालिकेने जाहीर नोटीस काढली आहे. (Gharkul scheme of 13 beneficiaries in Shivajiwadi cancelled Nashik News)

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत महापालिकेने घरकुल योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून १६००० घरकुल उभारण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, घरकुलासाठी जमीन मिळण्यापासून ते लाभार्थी मिळण्यापर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्याने टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांची संख्या कमी होत गेली. निलगिरी बाग येथे ११२०, सिडकोतील चुंचाळे येथे २८०० व ९६० असे दोन विभाग, पूर्व विभागातील वडाळा गाव येथे ७२०, भारतनगर येथे १४६०, तर सातपूर विभागात ४०० असे एकूण ७४६० घरकुले उभारण्यात आली.

लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करताना शासनाकडून अटी टाकण्यात आल्या होत्या. घरकुलाच्या एकूण रकमेपैकी काही प्रमाणात हिस्सा देणे बंधनकारक होते. एकूण लाभार्थ्यांपैकी शिवाजीवाडीतील १३ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा अदा न केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुदतीमध्ये आर्थिक हिस्सा अदा न केल्यास घरकुले रद्द करून त्याचा लाभ इतर पात्र तेरा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

Ratnagiri Tourist Rush : मुंबई-पुणेकरांची कोकणाला पसंती; 'लाँग वीकेंड'मुळे गणपतीपुळेत 3 दिवसात 65 हजार पर्यटक, कोटीच्या घरात उलाढाल

'दृश्यम'च्या पहिल्या दोन भागात दिसला पण तिसऱ्यात नाही, मराठी अभिनेत्याला वाटतंय वाईट; म्हणतो - गायतोंडेने...

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

SCROLL FOR NEXT