crime2.jpg 
नाशिक

धक्कादायक! 'तुझ्यामुळेच माझी बायको नांदायला येत नाही' म्हणत 'त्याने' उचलले टोकाचे पाऊल; परिसरात खळबळ

गोपाळ शिंदे

नाशिक : (घोटी) सततच्या भांडणाला कंटाळून तिने सासरी न जाण्याचा निर्णय घेतला होता. पतीचा मात्र वारंवार घेऊन जाण्याचा अट्टाहास. पहाटेच्या सुमारास दारू पिऊन तिच्या माहेरी तो गेला. रागाच्या भरात मारण्यासाठी तिच्या मागे पळत सुटला. तिच्या भावाला काही बघवेना. अन् नंतर घडले असे...

अशी घडली घटना

भरत रघुनाथ चव्हाण (वय 50) रा. इंदिरानगर, घोटी यांची बहीण लक्ष्मीबाई मोहिते हिचे नारायण साहेबराव मोहिते (वय 45) रा. चांदोरी ता. निफाड यांच्याशी लग्न झाले आहे. कौटुंबिक वाद व सततच्या भांडणामुळे लक्ष्मीबाई ही सासरी नांदायला जात नव्हती. शुक्रवारी (ता. 11) सायंकाळी पती नारायण हा तिला घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. मात्र पतीसोबत जाण्यास तिने नकार दिल्याने पतीचा चांगलाच पारा चढला. रागारागात जाऊन पती नारायण हा मद्यपान करुन शनिवारी (ता. 12) पहाटे पुन्हा आला. बायकोला शिवीगाळ करुन मारण्यासाठी पुढे आला. त्यावर मेहुणा भरत याने मध्यस्ती केली. याचा फायदा घेत बायको लक्ष्मीबाई हिने पळ काढला. तिचा मागोवा घेत पती नारायण मोहिते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील आवारात पोहचले. 

बहिणीला वाचविण्याचा नादात भावाने झेलला वार

बहिणीच्या काळजीपोटी भरतदेखील मागेच गेला. नारायण मोहिते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील आवारात पोहचला. मेहुणा भरत दिसताच, 'तुझ्यामुळेच माझी बायको नांदायला येत नाही. तुला नाही सोडणार' म्हणत पती नारायण याने रागाच्या भरात भरत याच्या हातावर चाकूने वार करत पोट चाकू खुपसला. भरत रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. स्थानिकांनी घटनेबाबत पोलिसांना कळविले.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घटनास्थळावरुन पळून जात असतांनाच नारायण याला अटक करण्यात आली. हातात चाकू घेऊन पळून जात असतांना पोलिसी पथकाने त्यास अटक केली. जखमी भरत चव्हाण यास तातडीने रुग्णवाहिका बोलावत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय वाघमारे हे करत आहे.  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT