water crisis news esakal
नाशिक

पाण्यासाठी घोटीकरांची वणवण; पाणीपुरवठा योजनेला मंत्रालयीन निर्णयाची प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : घोटीकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. आवश्‍यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता या योजनेच्या अंतिम निर्णय मंत्रालयीन स्तरावर अडकला असल्याने या निर्णयाची प्रतिक्षा घोटीकरांना लागली आहे. (ghoti people water struggle Waiting for ministerial decision on water supply scheme nashik Latest Marathi News)

ऐन पावसाळ्यामध्ये घोटीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी चार ते पाच दिवस वाट पाहण्याची वेळ आली आहे. शहराचा वाढता विस्तार, वाढलेली लोकसंख्या याचा ताण येथील जुन्या पाणीपुरवठा योजनेवर दिवसेंदिवस पडत आहे. यातच घोटी ही मोठी बाजारपेठ असल्याने येथे आजूबाजूच्या लोकसंख्येची वेगळीच भर पडत आहे. त्यामुळे सहा विभागांना पुरेसे पाणी देताना ग्रामपालिका प्रशासनाची चांगलीच दमछाकही होत आहे.

घोटीकरांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या पाठपुराव्यानंतर येथे सुमारे २० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यातून घोटीकरांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. भावली धरणातून पाणी उचलून ते घोटीकरांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सदर योजनेसाठी निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात येऊन आवश्‍यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

सदर योजना ही दोन कोटीहून अधिकची असल्याने याचा निर्णय हा मंत्रालयीन निविदा समितीकडून घेण्यात येत असतो. या समितीकडून ठेकेदार हे अंतिम झाल्यानंतर सदर कामाचे कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदार यांना दिले जातात.

परंतु सद्यःस्थितीत नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ह्या कामाच्या मंजुरीसाठी मंत्रालयीन स्तरीय निविदा समितीकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. समितीकडून अद्याप योजनेच्या अंतिम मंजुरीबाबत निर्णय न झाल्याने पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरवात झालेली नाही.

"घोटी येथील नवीन पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव मंत्रालयीन निविदा समितीकडे आहे. समितीकडून निर्णय झाल्यानंतर संबंधित ठेकेदार यांना कामाचे कार्यारंभ आदेश दिले जातील."

- एस.एस.मोरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT