girish mahajan ram pooja.jpg 
नाशिक

VIDEO : "मुख्यमंत्र्यांना निमंत्रण आले नाही, हे एक प्रकारे चांगलेच झाले.."गिरीश महाजन यांचे राज्य सरकारवर तोंडसुख

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अयोध्येतील भूमिपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर गिरीश महाजन यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह येथील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. काय म्हणाले गिरीश महाजन ..पाहा..

दोन्ही पक्षांना सांभाळायचे म्हणजे मुख्यमंत्र्याची चांगलीच फजिती

महाजन म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये, यासाठी त्यांच्या सहकारी पक्षांनी विधाने करण्यास सुरवात केली होती. कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी भूमिका घेतली होती. दुसरा सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने डोळे वटारून मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला अजिबात जाताच कामा नये, असे म्हटले. त्यात मुख्यमंत्र्यांचा गोंधळ झाला.

दोन्ही पक्षांना सांभाळायचे असल्याने त्यांची त्यात चांगलीच फजिती झाली आहे. त्यामुळे बरे झाले, त्यांना निमंत्रण आले नाही. कारण निमंत्रण आले असते, तरी ते गेले असते का? याविषयी मला शंकाच आहे. त्यामुळे निमंत्रण आले नाही, त्यामुळे एक प्रकारे हे चांगलेच झाले. "बरे झाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आले नाही. कारण आमंत्रण आले असते, तरी ते गेले असते, की नाही याविषयी शंकाच आहे. कारण सध्या त्यांची फजितीच झालेली आहे, असा टोमणा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना मारला आहे. 

ही सर्व मंदिरे खुली असायला हवी होती
महाजन म्हणाले, सध्या कोरोना आहे, याची सगळ्यांनाच जाणीव आहे. मात्र सर्व खबरदारी घेऊन भाविकांना धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी दिली पाहिजे होती. नाशिक हे श्रीरामांचे वास्तव्य असलेले शहर आहे. येथे कार्यकर्ते, संस्थांना धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यायला हवी होती. परंतु आज शहरातील सर्व मंदिरे बंद आहेत. धार्मिक संस्था बंद आहेत. हे अतिशय अयोग्य आहे. ही सर्व मंदिरे खुली असायला हवी होती. मात्र प्रशासनाने नागरिकांची अडवणूक केली आहे. 

 संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT