Leopard News esakal
नाशिक

Nashik Crime News : परमोरी येथे बालिकेवर बिबट्याचा हल्ला; गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : परमोरी येथे नरभक्षक बिबट्याने एका बालिकेवर हल्ला केला, त्यात ती गंभीर जखमी झाली असून या घटनेने परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.

बुधवारी (ता.२१) सायंकाळी पाचच्या दरम्यान अश्विनी लहु पवार (वय ९) ही गावाकडे येत असताना मॅकडॉल कंपनीलगत असलेल्या ओहळातून अचानक बिबट्या समोर आला. त्याने अश्विनीवर हल्ला केला.

तिच्या मानेलाच बिबट्याने पकडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. आईपासून हाकेच्या अंतरावरील मुलीला डोळ्यादेखत बिबट्याने उचल्याचे पाहताच आईने आरडाओरडा केला. तोवर बिबट्याने घरापासून जवळच असलेल्या उसात ओढत नेले.(Girl attacked by leopard in Parmori Severely injured Anger over neglect of forest department despite continuous incidents Nashik News)

त्यावेळी मुलीचे आई वडील बहिण व शेतकरींनी आरडाओरडा करताच बिबट्याने बालिकेला जखमी अवस्थेत टाकून पळ काढला. तिला तातडीने दिंडोरी रुग्णालयात दाखल केले. डॉ. काळे यांनी प्राथमिक उपचार केले, मानेवर जखमा असल्याने तिला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यापूर्वीही परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा बळी गेला आहे. बिबट्याचे वास्तव्य गेल्या अनेक वर्षांपासून असल्याने बिबट्याची पैदासही मोठ्या प्रमाणात आहे. नरभक्ष बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी परमोरीचे सरपंच दीपक केदारे, उपसरपंच दिघे दिंडोरी परमोरी चे सामाजिक कार्यकर्ते गणेश गांगोडे, आदींनी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परमोरीतील यापूर्वीच्या हल्ल्याच्या घटना

- सार्थक ज्ञानेश्वर दिघे (मृत, ३ वर्ष, घटना ऑगस्ट२०१८)

- शुभम राजेंद्र काळोगे (१०, जखमी), सप्टेंबर २०१९

- नकुल योगेश काळोगे (७, जखमी, मार्च २०१९)

- गायत्री प्रकाश गांगोडे (मृत, जानेवारी १९)

- अश्विनी लालू पवार (जखमी, ९ वर्ष, २१ जून २०२३).

"परमोरी गावात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. मात्र वनविभागाकडून पाहिजे अशी कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही. निदान आता तरी वनविभागाने जागे होऊन बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा उपोषण केले जाईल."

- पप्पू शिवले, परमोरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT