collage boys.jpg 
नाशिक

Motivational story : महाविद्यालयीन तरुणांकडून चिमुकल्यांना बाराखडी अन् एबीसीडीचे धडे; घराच्या अंगणात, झाडाखाली भरविली शाळा

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : शाळा बंद असल्याने बालवाडी, पहिली, दुसरीच्या वर्गात जाणाऱ्या चिमुकल्यांचे शिक्षण बंद आहे. यातच ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचेदेखील तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे क, ख, ग, घ अन् ए, बी, सी, डी, या अक्षरओळखचा विसर काही चिमुकल्यांना पडला आहे. पण या लहानग्यांच्या शिक्षणासाठी विखरणी (ता. येवला) गावातील महाविद्यालयीन तरुण पुढाकार घेत मुलांच्या घरी जाऊन झाडाच्या सावलीत त्यांना बाराखडी अन् एबीसीडीचे धडे देत आहेत. 

बाराखडी अन् एबीसीडीचे धडे
लॉकडाउनमुळे अजूनही शाळा सुरू झालेल्या नसल्याने प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. शाळांना कुलूप लागायला आता वर्ष होत आल्याने चिमुकल्यांचा शाळेचा लळा तुटल्याने वर्गाची अन् अक्षरांचीदेखील ओळख विसरण्याची स्थिती झालेली आहे. त्यामुळे आपल्या गावातील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांचा अन् ज्ञानाचा झरा अखंडपणे वाहत राहावा यासाठी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 

घराच्या अंगणात, झाडाखाली भरवितात शाळा, शिक्षकांचीही मदत 
येथील जिल्हा परिषदेच्या बिजलाबाईनगर शाळेच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रवींद्र रोठे व शाळेतील शिक्षकांच्या मदतीने हरिभाऊ वाघमोडे, योगेश शेलार व गीता बिडगर या महाविद्यालयीन तरुणांनी विद्यार्थ्यांना एकत्र येऊन ही आगळीवेगळी शाळा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या घरोघरी निसर्गाच्या सान्निध्यात झाडाखाली, तर कधी चावडीवर एक तास विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास या उपक्रमांतर्गत अध्यापनाचे धडे हे विद्यार्थी देत आहेत. ज्ञानदान करणाऱ्या या तरुणांना शिकविण्यात काही अडचण येऊ नये यासाठी या शाळेतील शिक्षक राजेंद्र घोलप, नितीन शिंदे, मंजूषा जाधव व इतर सहकारी शिक्षक या तरुणांना मदत करत आहेत. शाळा सुरू होत नाही तोपर्यंत हा उपक्रम असाच सुरू ठेवण्याचा निर्धार वाघमोडे व शेलार यांनी व्यक्त केला. बापूसाहेब शेलार, दत्तू शेलार, अरुण शेलार यांच्यासह ग्रामस्थांचे याकामी सहकार्य मिळत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: KL Rahul ने शतकानंतर का वाजवली शिट्टी? या नव्या सेलिब्रेशनमागचं नेमकं कारण काय?

Video : राजेशच राकेश असल्याचं सत्य ईश्वरीसमोर उघड ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता तरी तिला अक्कल येऊ दे"

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Dmart Offers : दसरा स्पेशल! डीमार्टमध्ये 'या' वस्तू मिळतायत जास्त स्वस्त, पुढचे 4 दिवस डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर..

OBC Scholarship Schemes : १०वी, १२वीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना मिळते शासनाची शिष्यवृत्ती, सरकारच्या 'या' ८ योजना जाणून घ्या....

SCROLL FOR NEXT